Pune News : 22 जानेवारीला एक दिवसीय विद्वत संमेलन

एमपीसी न्यूज : विश्व हिंदू परिषदेच्या महाराष्ट्र प्रदेश सामाजिक समरसता विभागाच्या वतीने रविवार, 22 जानेवारी 2023 रोजी एक दिवसीय विद्वत संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. लेडी रमाबाई सभागृह, स. प. महाविद्यालय, टिळक रस्ता, पुणे  येथे (Pune news) सकाळी 9 ते सायंकाळी 5 या कालावधीत संपन्न होणाऱ्या या संमेलनात विविध विचारवंत, अभ्यासक आणि साहित्यिक यांच्या एकत्रित सहभागातून विचारमंथन करण्यात येणार आहे.

संमेलनाचे उद्घाटन सकाळी 10.00 वाजता शिक्षण प्रसारक मंडळी पुणेचे अध्यक्ष ॲड. एस. के. जैन यांच्या हस्ते होणार असून विश्व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय समरसता प्रमुख देवजीभाई रावत हे विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष पांडुरंग राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत बीजभाषण करतील. सकाळी 11.45 वाजता डॉ. श्यामा घोणसे यांच्या अध्यक्षतेखाली ‘भारतीय संविधान आणि संतसाहित्य अंतरंग संबंध’ या पहिल्या सत्रातील परिसंवादात ह. भ. प. सुभाषमहाराज गेठे आणि प्रा. दिगंबर ढोकले सहभागी होतील.

Chakan News : महाराष्ट्र केसरी शिवराजचा चाकण मध्ये सन्मान

भोजनोत्तर दुसऱ्या सत्रात दुपारी 2.00 वाजता पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या अध्यक्षतेखाली ‘भारतीय संविधान आणि धार्मिक स्वातंत्र्य’ या परिसंवादात ॲड. प्रशांत यादव आणि ॲड. सतीश गोरडे आपले विचार मांडतील. दुपारी 3.30 वाजेच्या तिसऱ्या सत्रात रमेश पांडव यांच्या अध्यक्षतेखाली सागर शिंदे आणि डॉ. सुनील भंडगे ‘भारतीय संविधान आणि सामाजिक समरसता’ या परिसंवादात सहभाग घेतील.

विश्व हिंदू परिषद मुंबई क्षेत्र समरसता प्रमुख गणेश मोकाशी आणि ज्येष्ठ साहित्यिक रमेश पतंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत दुपारी 4.30 वाजता समारोप सत्र संपन्न होईल. उद्घाटन सत्रात मान्यवरांच्या हस्ते डॉ. श्यामा घोणसे लिखित ‘भारतीय संत आणि समरसता’ तसेच रमेश पतंगे लिखित ‘आपले संविधान’ या पुस्तकांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. अत्याधुनिक जीवन जगणाऱ्या आजच्या भारतीय समाजाला भारतीय (Pune News) संविधानाच्या चौकटीत राहून बंधुता, समता आणि समरसता यांची मूल्यजोपासना करता यावी या उद्देशाने संपन्न होणाऱ्या या संमेलनात विनाशुल्क सहभागासाठी https://forms.gle/fQ6yoZnCSLWxbHhQ8 या संकेतस्थळावर नोंदणी करावी, असे आवाहन विश्व हिंदू परिषद प्रांत मंत्री संजय मुदराळे, व सहमंत्री ॲड. सतीश गोरडे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.