Maharashtra : शिवसेनेच्या सत्तासंघर्षाची उद्या पुन्हा सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

एमपीसी न्यूज : महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या शिवसेनेच्या सत्तासंघर्षाची आज सर्वोच्च न्यायालयात पाच सदस्यीय घटनापीठापुढे सुनावणी पार (Maharashtra) पडली. उद्या पुन्हा सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी सुनावणी होणार आहे.

अरुणाचल प्रदेशच्या नबाम रेबिया प्रकरणावर पुन्हा एकदा मोठ्या घटनापीठाकडून पुनर्विचार करण्यात यावा अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. तर यावर तशी काही गरज नसल्याचं शिंदे गटाचे वकील अॅड. हरिष साळवे यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केलं. या प्रकरणावर उद्या पुन्हा एकदा सुनावणी होणार असून त्यावर उद्या किंवा परवा यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे.

Pune Crime : साडेचार लाखांच्या मेफेड्रोनची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक

दरम्यान, आज पाच सदस्यीय घटनापाठीपुढे झालेल्या सुनावणीत शिवसेनेचे (ठाकरे गट) वकील कपिल सिब्बल, वकील अभिषेक मनु सिंघवी (Maharashtra) आणि वकील देवदत्त कामत यांनी युक्तीवाद केला आहे. तर, बुधवारी होणाऱ्या सुनावणीत शिंदे गटाचे वकील हरीश साळवे हे युक्तीवाद करणार आहे. शिंदे गटाकडून नबाम रेबिया प्रकरणाचा सातत्याने दाखला देण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.