Pune Crime : साडेचार लाखांच्या मेफेड्रोनची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक

एमपीसी न्यूज : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने (Pune Crime) कोथरूड परिसरात 4.26 लाख रुपये किमतीच्या 20 ग्रॅम मेफेड्रोनची (MD) तस्करी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक केली.

पदमसिंग हेमंत पाटील (वय 23, रा. सुसगाव) आणि यश संतोष शिंदे (वय 22, रा. वारजे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस शिपाई विशाल शिंदे यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी कारवाई करत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय लक्ष्मण ढेंगळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाच्या मदतीने दोघांना अटक केली. पोलिसांनी ड्रग्ज, त्यांची कार, मोबाईल फोन आणि इलेक्ट्रॉनिक वजनाचे यंत्र जप्त केले.

अतिरिक्त पोलिस आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे, डीसीपी (गुन्हे) अमोल झेंडे, एसीपी सुनील पवार (Pune Crime) यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

Pune Crime : माथाडीच्या नावावर खंडणी उकळणाऱ्यावर मोक्का अंतर्गत कारवाई

या पथकात वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, एपीआय लक्ष्मण ढेंगळे, शैलजा जानकर, तसेच ज्ञानेश्वर घोरपडे, मनोजकुमार साळुंके, विशाल दळवी, राहुल जोशी, पांडुरंग पवार, सचिन माळवे, संदेश काकडे, रेहाना शेख, नितेश जाधव, योगेश मोहिते यांचा समावेश होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.