Pune Crime : माथाडीच्या नावावर खंडणी उकळणाऱ्यावर मोक्का अंतर्गत कारवाई

एमपीसी न्यूज –  माथाडीच्या नावावर खंडणी उकळणाऱ्या (Pune Crime) रविंद्र ससाणे व त्याच्या दोन साथीदारांवर मोक्का अतंर्गत विमानतळ पोलिसांनी कारवाई केली आहे.

रविंद्र जयप्रकाश ससणे (वय 49 रा. विमाननगर), मंगल रमेश सातपुते (वय 40, रा. धानोरी), दिपक संपत गायकवाड (वय 40, रा. खडकी) अशी कारवाई करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी पुण्यातील फिनीक्स मॉल येथे कामगारांकरवी ट्रक खाली करण्यासाठी खंडणीची मागणी करत मॉल मधल्यांना व्यवसाय करण्यास प्रतिबंध केला. ससाणे हा त्याच्या साथीदरांसह स्वतःचे गुन्हेगारी वर्चस्व व दहशत निर्माण करण्यासाठी हिंसाचाराचा वापर करत, मालमत्तेचे नुकसान (Pune Crime) करणे खंडणी मागणे अशी गुन्हे त्याच्यावर दाखल होते.

Pune News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘सिनेट’वर आमदार रोहित पवार; विधीमंडळाकडून नियुक्ती

प्रतिबंधात्मक कारवाई करुन देखील त्यांच्यावर गुन्हेगारी कारवाई थांबत नसल्याने विमानतळ पोलिसांनी ससाणे व त्यांच्या साथीदारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. याचा पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.