Maharastra : आता विधानसभा अध्यक्षांकडून तारीख पे तारीख; शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी 13 ऑक्टोबरला

एमपीसी न्यूज – सर्वोच्च न्यायालयाकडून शिवसेना आमदार (Maharastra) अपात्रतेविषयी पुढील एका आठवड्यात सुनावणी घेण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना देण्यात आले होते. त्यानुसार शिवसेना आमदार अपात्रतेविषयी सुनावणी आज विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांच्या समोर विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात पार पडली. यावेळी पुढील सुनावणी 13 ऑक्टोबरला होणार असल्याचे कळते.

Pune : दुसरा राष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवाला बुधवारी पुण्यात होणार सुरुवात, 12 राज्यातून 55 लघुपटांचा समावेश

सुनावणी दरम्यान दोन्ही पक्षकारांकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला आहे. यावेळी दोन्ही गटाकडून अध्यक्षांकडे आवश्यक घटनाक्रम व कागदपत्रे सादर करण्यात आले असून सुनावणी प्रक्रियेमध्ये आमदारांची उलट तपासणीचा समावेश करण्यात आला आहे. उलट तपासणीचा प्रक्रिये दरम्यान दोन्ही गटातील आमदारांना व दोन्ही पक्षप्रमुखांना बोलावून त्यांची साक्ष नोंदवावी लागणार आहे. त्यात डिसेंबर महिन्यामध्ये हिवाळी अधिवेशन असल्याने अध्यक्ष त्यामध्ये व्यस्त असतील. त्यामुळे या सर्व प्रक्रियेला 3 ते 4 महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. तथापि, शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल लागण्याकरीता नवीन वर्ष उजाडण्याची शक्यता आहे.

दरम्यान, शिवसेना आमदार अपात्रतेविषयी दोन आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात देखील सुनावणी पार पडणार असल्याने, येणाऱ्या काळात काय घडेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.