Mahavitaran : महावितरणच्या प्रादेशिक नाट्यस्पर्धेत पुणे परिमंडलाचे ‘सवाल अंधाराचा’ सर्वोत्कृष्ट

एमपीसी न्यूज – महावितरणच्या पुणे प्रादेशिक विभाग अंतर्गत आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धेत पुणे परिमंडलाने ‘सवाल अंधाराचा’  (Mahavitaran) या नाटकाचे सर्वोत्कृष्ट सादरीकरण करीत प्रथम क्रमांकाचा करंडक पटकाविला. तर कोल्हापूर परिमंडलाचे ‘इस्किलार’ या नाटकाला द्वितीय क्रमांकाचा मान मिळाला.

पद्मावती येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात महावितरणच्या पुणे प्रादेशिक विभागातील दोन दिवसीय आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धेचा मंगळवारी (दि. 8) समारोप झाला. यावेळी थाटात झालेल्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात महावितरणचे संचालक (संचालन) संजय ताकसांडे यांची मुख्य पाहुणे म्हणून उपस्थिती होती. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रादेशिक संचालक (प्र.) अंकुश नाळे, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. संजय ढोके, मुख्य अभियंते सचिन तालेवार (पुणे), सुनील पावडे (बारामती), परेश भागवत (कोल्हापूर) यांची उपस्थिती होती. पाहुण्यांच्या हस्ते नाट्यस्पर्धेतील विजेत्या संघांना करंडक तसेच वैयक्तिक गटातील विजेत्यांना स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

महावितरणचे संचालक (संचालन) संजय ताकसांडे म्हणाले, की नाट्यस्पर्धांच्या आयोजनातून महावितरण सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध होत आहे. रंगकर्मी प्रगल्भ होत आहेत. व्यावसायिक नाटकांच्या तोडीच्या नाट्यकृती सादर केल्या जात आहेत. ही स्पर्धा असली तरी नाट्यनिर्मितीच्या प्रक्रियेचा आनंद रंगकर्मींसाठी वेगळाच असतो.(Mahavitaran) रंगभूमी ही जिवंत कलेचे व्यासपीठ आहे. तिथे चित्रपटासारखे रिटेक नाही. त्यामुळे अतिशय धकाधकीच्या वीजक्षेत्रात काम करणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना राज्यभरातील नाट्यमहोत्सव हा नवऊर्जा देणारा आहे.

RTO : ‘आरटीओ’च्या सुधारित आकृतीबंधाची अंमलबजावणी करण्याची मागणी

नाट्यस्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी पुणे परिमंडलाने मुख्य अभियंता सचिन तालेवार निर्मित व अधीक्षक अभियंता पवार दिग्दर्शित ‘सवाल अंधाराचा’ ही नाट्यकृती सादर केली. प्र.ल. मयेकर लिखित या नाटकाच्या प्रभावी सादरीकरणाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.(Mahavitaran) या नाटकासह कोल्हापूर परिमंडलाचे ‘इस्किलार’ व बारामती परिमंडलाचे ‘ब्लाईंड गेम’ या नाटकांच्या सादरीकरणाचे परीक्षण नाट्यपरीक्षक संजय गोसावी, अरुण पटवर्धन व सौ. मंजुषा जोशी यांनी केले. यामध्ये पुणे परिमंडलांचे ‘सवाल अंधाराचा’ नाटकाने प्रथम तर कोल्हापूर परिमंडलाचे ‘इस्किलार’ नाटकाने द्वितीय क्रमांक पटकाविला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.