Mallika Sherawat: ‘ती’ जॉगिंग करायला बाहेर पडली, पण…

Mallika Sherawat: 'She' went out jogging, but ... हॉट बेब मल्लिका शेरावत जॉगिंग करण्यासाठी घराबाहेर पडली होती. तेवढ्यात तिने फोटोग्राफर्सना पाहिलं आणि तिची धावपळ उडाली.

एमपीसी न्यूज – सध्या सरकारने लॉकडाऊन थोडा शिथिल करुन लोकांना काही सवलती दिल्या आहेत. त्यात वैयक्तिक व्यायामाला मुभा मिळाली आहे. मात्र ग्रुपने खेळणे शक्य नाही. मागील तीन महिन्यांपासून घरात लॉकडाऊन झाल्याने सर्वजण बोअर झाले आहेत. आणि जे फिटनेसच्या बाबतीत जागरुक आहेत ते जॉगिंग करायला बाहेर पडत आहेत.

अशीच एक हिरॉईन व्यायामासाठी बाहेर पडली. पण … मागे येणा-या फोटोग्राफर्सना बघून मात्र तिची धावपळ उडाली. हॉट बेब मल्लिका शेरावत जॉगिंग करण्यासाठी घराबाहेर पडली होती. तेवढ्यात तिने फोटोग्राफर्सना पाहिलं आणि तिची धावपळ उडाली. फोटोग्राफर्सची नजर चुकवून पळणाऱ्या मल्लिकाचा गंमतीशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

मल्लिकाचा हा व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये मल्लिका जॉगिंग करताना दिसतेय. करोनापासून वाचण्यासाठी तिने आपल्या तोंडावर मास्क लावला आहे. मास्कमुळे मल्लिका चटकन ओळखू येत नाही आहे. परंतु तेथे उपस्थित असलेल्या फोटोग्राफर्सनी मात्र तिला अचूक ओळखले.

ते फोटो काढण्यासाठी तिच्या मागे पळू लागले. त्यांना पाहून मल्लिका देखील पळू लागली. हा पकडापकडीचा गंमतीशीर खेळ या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतोय. यात कोण जिंकलं ते तुम्हीच ओळखा.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.