Pimpri : स्मशानभूमीच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मनसेचे तिरडी आंदोलन

एमपीसी न्यूज –  विविध मागण्यांसाठी राजकीय पुढारी वेगवेगळ्या पध्दतीने आंदोलन करताता. मात्र शहरातील मनसेच्यावतीने स्मशानभूमीच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी तिरडी आंदोलन करण्यात आले. 
 
हे आंदोलन मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी गेल्या 15 वर्षांपासून स्मशानभूमीचा प्रश्न सुटलेला नाही. निगडी, वडमुखवाडी च-होलीगाव, चिंचवडगाव, जुनी सांगवी याठिकाणी असणा-या स्मशानभूमीचा प्रश्न  पिंपरी-चिंचवड महापालिकेला सोडविता आला नाही. प्रशासनाच्या विरोधात आज मोरवाडी येथील हॉटेल घरोंदा ते पिंपरी-चिंचवड महापालिकेपर्यंत तिरडी आंदोलन कऱण्यात आले. स्मशानभूमीचा असलेला प्रलंबित प्रश्न लवकर सुटावा,  अशी मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनात  सचिव  राजू सावळे, रुपेश पटेकर,  दत्ता देवतरसे, हेमंत डांगे, उपशहराध्यक्ष चंद्रकांत दानवले, भोसरी विधानसभा अध्यक्ष विशाल मानकरी, अंकुश तापकीर, महिला सेनेच्या  आश्विनी बांगर, विभाग अध्यक्षा अनिता पांचाळ  आदी उपस्थित होते. जुनी सांगवीतीन वर्षापासून नागरिकांना उन,,पाऊस डोक्यावर घ्यावा लागत आहे. कारण आरसीसी शेडच नाही. वारंवार पत्र देईन देखील अद्याप काम नाही. स्थापत्य विभागाकडून उडवाउडविची उत्तरे दिली जात आहेत.
 
स्मशानभूमीची अतिशय दुरावस्था झाली असून आधुनिक विद्युतदाहिनीची व्यवस्था नाही. नागरिकांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. यावेळी भाजप सरकार हाय हाय,  स्मशानभूमी झालीच पाहिजे अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. आधुनिक विद्युतदाहिनीची व्यवस्था नाही. त्याचप्रमाणे अखंडित विद्युत सेवा आणि शेड या समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागते. वडमुखवाडी येथील स्मशांभूमिचा असून हा प्रश्न गेली २२ वर्षापासून तसाच प्रलंबित राहिला आहे . वडमुखवाडी , चोविसावाडी , काळेभिंत , काटे वस्ती , साई मंदिर या भागात कोठेही स्मशानभूमी नसल्याने नागरिकाना चार – ते पाच किमी चा प्रवास करावा लागतो . भर पावसात हा प्रवास सहन करण्या पलीकडचा आहे , तरीही ना विलाजाने हा प्रवास नागरिकाना करावा लागतो . इंद्रायणी काठावरच्या स्मशान भूमीत गेल्यावर तरी त्या प्रेतात्म्याला न्याय मिळेल याची खात्री नाही , तिथे गेल्यावर स्थानिक म्हणून आळंदी परिसरातील प्रेतात्म्याला न्याय देण्याची भूमिका घेतली जाते . त्यामुळे या भागातील प्रेतात्म्याची होणारी हेळसांड कायम आहे . 

चिंचवडगाव कराना  हक्काची स्मशानभूमी नसल्यामुळे सर्व ग्रामस्थांना नाईलाजास्तव दुस-या  गावात जाऊन अंत्यविधी करावा लागतो  हा नाहक त्रास किती  दिवस सहन करावे लागत आहे.  झोपलेले प्रशासन, मेलेले सरकार, प्रलंबित स्मशानभूमीच्या प्रश्नांची नाही कोणाला दरकार, लाक्षनिकच मारतो आम्ही, आता झोपतो चितेवर,काहीच समजत नसेल तर, आमच्या मरणाचा तरी प्रश्न सोडवा, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
 
याबाबत अनेक वेळा प्रशासनाला विनंती पत्र देऊन देखील प्रशासनाने दाखल घेतली नाही. या प्रशासनाचा निषेध म्हणून हे आंदोलन केले.  झोपलेले प्रशासन, मेलेले सरकार, प्रलंबित स्मशानभूमीच्या प्रश्नांची नाही कोणाला दरकार अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या, तिरडी आंदोलन प्रकरणी मनसेच्या पदाधिका-यांना अटक  करण्यात आली. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.