Maratha Reservation : धाराशिवमध्ये संचारबंदी, जाळपोळीच्या घटनेमुळे प्रशासनाचा निर्णय

एमपीसी न्यूज -सध्या मराठा आरक्षणाच्या मागणीवरून सुरू असलेल्या आंदोलनाला (Maratha Reservation) धाराशिव जिल्ह्यात हिंसक वळण लागले आहे. एसटी बसवर दगडफेक, बस जाळणे, तहसीलदारांच्या गाडीवर हल्ले, आणि लोकप्रतिनिधींच्या घरांवर हल्ले, तोडफोड आणि जाळपोळीच्या घटनेमुळे धाराशिव जिल्हा हादरला आहे.

धाराशिव जिल्ह्यात अनेक ठिकाणी हिंसक आंदोलन होऊन खासगी मालमत्तेचे (Maratha Reservation) नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा विचार करता जिल्हाधिकाऱ्यांनी आज जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या बाबत आदेश जारी करण्यात आलेआहे.

Maratha Reservation : आंदोलकांनी फोडल्या 60 बस; अखेर बीडमध्ये संचारबंदी लागू
जिल्हयात चालू असलेल्या आंदोलनामुळे सार्वजनिक व खाजगी मालमत्तेस मोठया प्रमाणावर हानी पोहचत आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्ह्याच्या विविध भागात आंदोलन, उपोषण, निदर्शने सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर संचारबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहे.

संचारबंदीच्या आदेशातून यांना सुट
1. शासकीय / निमशासकीय कार्यालये.
2. दूध वितरण.
3. पिण्याचे पाणी पुरवठा व सांडपाणी निचरा व्यवस्थापन करणा-या आस्थापना.
4. सर्व बँका,
5. दूरध्वनी व इंटरनेट सेवा पुरवठा करणा-या आस्थापना.
6. रस्ते वाहतूक व रेल्वे व्यवस्था यांना सुट दिली आहे.

संचारबंदीत पाचपेक्षा अधिक व्यक्तीना एकत्र येता येणार नाही. कोणत्याही प्रकारचे शस्त्र, ज्वलनशील पदार्थ, स्फोटके सोबत बाळगता येणार नाहीत.

धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील तुरोरी येथे कर्नाटकची बस पेटवण्यात आली.

धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यामध्ये तुरोरी येथे कर्नाटकमधून उमरग्याकडे येणारी कर्नाटकमधील एसटी बस आंदोलकांनी पेटवली. बसमधील प्रवासी उतरवून ही बस पेटवण्यात आली. बस मध्ये 39 प्रवाशी होते. सर्व प्रवाशांना खाली उतरवून बसला आग लावण्यात आली.
राज्यात मध्यरात्रीपासून या आंदोलनाला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.