Maratha Reservation : आंदोलकांनी फोडल्या 60 बस; अखेर बीडमध्ये संचारबंदी लागू

एमपीसी न्यूज : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बीडमध्ये (Maratha Reservation) आंदोलन पेटले आहे. दोन आमदारांच्या बंगल्यावर केलेले हल्ले तसेच नगर परिषद पेटवल्यानंतर आता संतप्त आंदोलकांनी बस स्थानकात उभ्या असलेल्या जवळपास 60 बसची तोडफोड केली आहे.  यामुळे आता बीडमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 

आंदोलकांनी बीडमध्ये आमदार प्रकाश सोळंके, आमदार संदीप क्षीरसागर आणि माजलगाव नगर परिषद आंदोलकांनी पेटवून दिली. पुढे आंदोलकांनी आपला मोर्चा बस स्थानकात वळवला असून आंदोलकांनी बस स्थानकातील कंट्रोल रूमही फोडली आहे.

Pimpri : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास ओबीसी संघर्ष सेनेचा विरोध

या हिंसक वळणावर आता जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदीच्या आदेशाचं पत्र काढले असून सर्वसामान्यांना त्रास झाला तर पोलीस आता गुन्हे दाखल करून आंदोलकांवर कडक कारवाई करतील, असा इशारा बीडचे पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिला आहे. तसंच पोलिसांना बळाचा वापर करावा लागल्याची कबुली पोलीस अधिक्षकांनी दिली. अश्रुधुराच्या नळकांड्या (Maratha Reservation) फोडण्यात आल्या तसंच रबर फायर आणि लाठीचार्ज केल्याचं त्यांनी सांगितलं.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.