Pimpri : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास ओबीसी संघर्ष सेनेचा विरोध

एमपीसी न्यूज – मराठा समाजाला ओबीसीतून (Pimpri) आरक्षण देण्यास ओबीसी संघर्ष सेनेने विरोध दर्शविला आहे. त्याबाबत ओबीसी संघर्ष सेनेच्या वतीने पिंपरी चिंचवडच्या तहसीलदार अर्चना निकम यांना पत्र देण्यात आले आहे. तहसीलदार निकम यांच्याद्वारे हे पत्र मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार आहे. यावेळी ओबीसी संघर्ष सेना शहराध्यक्ष वैजनाथ शिरसाट, सुरेश गायकवाड, ओबीसी नेते माऊली बोराटे, गवळी समाजाचे अध्यक्ष योगेश लंगोटे, लक्ष्मण पांचाळ, लहू अनारसे, अनंत शेवाळे, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पत्रात ओबीसी सेनेने म्हटले की, मुख्यमंत्री एकनाथ रावजी शिंदे साहेब महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा समोर येत आहे, त्याला आमचा पाठिंबा आहे. परंतु मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी या ठिकाणी उपोषण करत मराठा समाजाला ओबीसीतून सरसकट कुणबी आरक्षण मिळावे अशी मागणी केली आहे, या मागणीला ओबीसी समाजाचा विरोध आहे.

Talegaon Dabhade : हभप माऊली कदम महाराजांनी सांगितले माणसाच्या सुखाचे गमक

कारण ओबीसी मध्ये मुळातच 400 पेक्षा जास्त जाती आहेत. त्या आजतागायत प्रवाहामध्ये आलेल्या नाहीत, असे असताना (Pimpri) मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण दिल्यास ओबीसी समाजावर मोठा अन्याय होईल . त्यामुळे ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला वेगळे आरक्षण देण्यात यावे.

मनोज जरांगे पाटील ओबीसी आरक्षणावरती ठाम आहेत, ही भूमिका कुठेतरी दोन समाजामध्ये वाद निर्माण करणारी भूमिका आहे. तरी सरकारने मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातुन आरक्षण देण्यास आमचा विरोध आहे, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.