Maval : मावळच्या निवडणूक निर्णय अधिकारीपदी दीपक सिंगला यांची नियुक्ती

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक ( Maval) निर्णय अधिकारीपदी पीएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त  दीपक सिंगला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सिंगला यांनी मावळ मधील विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्राचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. पिंपरीनंतर आज बुधवारी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत.

Pune : कॅबचालकांनी पुकारला बेमुदत बंद ; ओला आणि उबर कंपन्यांच्या विरोधात सुरु आहे आंदोलन

शिरूर  लोकसभेच्या निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे, बारामती लोकसभेच्या निवडणूक निर्णय अधिकारीपदी कविता द्विवेदी यांची नियुक्ती झाली आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसंबंधी कामासाठी नियुक्त निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आणि समन्वयक अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले होते. पात्र व्यक्तींची मतदार नोंदणी आणि नोंदणी झालेल्या मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहीत करण्यावर भर द्यावा, निवडणूक प्रक्रिया उत्तमरीतीने पार पाडण्याला प्राधान्य द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.दिवसे यांनी दिले.

डॉ.दिवसे म्हणाले, निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार सर्व कामे वेळेवर होतील याची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी. निवडणूक आयोगाने दिलेली कालमर्यादा पाळण्यासाठी अधिकाऱ्यांनी जबाबदारीने आणि क्षमतेने काम करावे. चारही मतदारसंघात जबाबदऱ्यांची मानके किंवा नमुने ठरवून त्यानुसार काम करावे. दिव्यांग मतदारांना सुलभतेने मतदान करता यावे यासाठी मतदान केंद्रावर विशेष सुविधेचे नियोजन करावे.

एकाच ठिकाणी पाच पेक्षा अधिक मतदान केंद्र असल्यास अशा ठिकाणी स्वयंसेवकांची मदत घ्यावी. पुणे शहरात प्रत्येक प्रभाग कार्यालयात मतदारांना मतदान केंद्राची माहिती देण्यासाठी सुविधा करण्यात यावी. महिला कर्मचाऱ्यांची नेमणूक करतांना त्यांच्यासाठी आवश्यक सुविधा मिळतील याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तक्रार निवारण कक्ष सुरू करावा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

कळसकर यांनी सादरीकरणाद्वारे निवडणूक पूर्वतयारीची माहिती दिली. बैठकीत मतमोजणी स्थळ, वाहतूक आणि संवाद आराखडा, दिव्यांग मतदारांसाठी सुविधा, निवडणूक विषयक विविध प्रकारचे प्रशिक्षण, निवडणुकीसाठी मनुष्यबळ, निवडणूक खर्चाबाबत  दर निश्चिती, आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी आदीविषयक आढावा ( Maval)  घेण्यात आला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.