Alandi : नारायणगाव व आळंदीमध्ये मोफत मराठा वधूवर परिचय मेळावा

एमपीसी न्यूज – सकल मराठा समाज व मराठा सोयरीक संस्था आयोजित (Alandi) भव्य मोफत मराठा वधुवर परिचय मेळावे यांचे नारायणगाव (ता. आंबेगाव जि. पुणे) व आळंदी (ता. खेड जि.पुणे) येथे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवार दि 8 मार्च रोजी 83 मेळावा दुपारी 12 वा.निलायम गार्डन ,गार्डन नारायणगाव येथे पार पडणार आहे. तर 84 वा मेळावा रविवार दि.10 रोजी दु.12 वा.ज्ञानसागर मंगल कार्यालय आळंदी देवाची येथे पार पडणार आहे. या मेळाव्याला विशेष सहकार्य माऊलीं महाराज घोडके ,गोरख अनुभले यांचे लाभले आहे.

या कार्यक्रमास स्वागताध्यक्ष रोहिदास तापकीर,उत्तम गोगावले म्हणून उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमात अशोक कुटे ,प्रभाकर कड पाटील यांचे मार्गदशन लाभणार आहे.या कार्यक्रमात पालकांसह वधू वर यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन कविता बोंबले, मंगल राक्षे, अनिता झुझम,कैलास थोरवे, किरण कड , बाळासाहेब ताये इ.केले (Alandi) आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.