Pune : कॅबचालकांनी पुकारला बेमुदत बंद ; ओला आणि उबर कंपन्यांच्या विरोधात सुरु आहे आंदोलन

एमपीसी न्यूज – प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने( Pune)  वातानुकूलित टॅक्सीच्या भाडेदरात वाढ करूनही ओला आणि उबर या कंपन्यांनी त्याची अंमलबजावणी केलेली नाही. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत तोडगा न निघाल्याने  कॅबचालकांनी मंगळवारपासून बेमुदत बंद पुकारला आहे.

Today’s Horoscope 06 March 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील कॅबचालकांनी काल  (दि . 05 मार्च ) सकाळी 7 पासून हा बंद सुरू केला. या बंद दरम्यान, अनेक ठिकाणी प्रवाशांना कॅब मिळत नसल्याचे चित्र दिसून आले. विशेषत: पुणे विमानतळावरील प्रवाशांना याचा मोठा फटका बसला. विमानतळावरील एरोमॉल येथे मंगळवारी अतिशय कमी कॅब होत्या. त्यामुळे प्रवाशांना कॅब मिळविण्यासाठी प्रतीक्षा करावी लागली. बंदचा फायदा घेऊन काही कॅबचालकांनी जादा पैसे उकळण्याच्या ( Pune)  घटना  घडल्या.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.