Today’s Horoscope 06 March 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज –  Today’s Horoscope 06 March 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग

आजचा दिवस – बुधवार.

तारीख – 06.03.2024.

शुभाशुभ विचार – 12 नंतर चांगला.

आज विशेष – विजया एकादशी.

राहू काळ – दुपारी 12.00  ते 1.30

दिशा शूल – उत्तरेस असेल.

आज नक्षत्र – पूर्वा शाढा 14.52 पर्यंत नंतर उत्तरा शाढा.

चंद्र राशी – धनु 20.28  पर्यंत नंतर मकर.
—————————–
मेष – ( शुभ रंग – राखाडी)

नोकरी साहेबांची मर्जी राखावी लागेल. तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना दैवाची साथ लाभेल. घरात एखादे धार्मिक कार्य करण्याचे मनात येईल. ज्येष्ठ मंडळींनी सत्संगात रमावे.

वृषभ-  ( शुभ रंग- भगवा)

आज जे काय करायचं ते तब्येतीस जपूनच करा. आपल्या कुवती बाहेर जबाबदारी स्वीकारू नका. गोड बोल्या मंडळांपासून लांबच रहा. आज पत्नी सांगेल ते योग्यच असेल.

मिथुन – ( शुभ रंग- पिस्त)

उद्योग धंद्यातील वाढत्या स्पर्धेला समर्थपणे तोंड द्याल. अडचणीत जोडीदाराची खंबीर साथ राहील. आज तुम्ही एखादा विवाह जुळवण्यात यशस्वी मध्यस्ती कराल.

कर्क – (शुभ रंग – गुलाबी)

नोकरदारांवर कामाचा वाढता ताण राहील. ध्येय साध्य करण्यासाठी कामाचे तास वाढवावे लागतील. आज जोडीदार जे मिळेल त्याला हो म्हणणे हिताचे राहील

सिंह -( शुभ रंग – जांभळा )

सौंदर्य प्रसाधनांचे व्यवसाय चांगले चालतील. कला व क्रीडा क्षेत्रातील मंडळी उत्कृष्ट कामगिरी करतील. उच्चशिक्षित मंडळींच्या महत्त्वकांक्षा वाढतील. प्रकृती उत्तम राहील.

कन्या – ( शुभ रंग- आकाशी)

आज गृह सौख्याचा दिवस असून पारिवारिक सदस्यात सुसंवाद राहील. दिवसाची सुरुवात अत्यंत सकारात्मकतेने कराल. आज तुम्ही गरजूंना सढळ हस्ते मदत कराल.

तूळ – ( शुभ रंग- पांढरा)

कार्यक्षेत्रात आज विरोधकांशी ही गोड बोलून आपला स्वार्थ साधून घ्यावा लागेल. बेरोजगार असाल तर नोकरीचे कॉल्स येतील. आलेल्या संधींचा वापर करा.

वृश्चिक- ( शुभरंग – निळा)

एखाद्या महत्त्वाच्या बातमीने आजच्या दिवसाची सुरुवात होईल. आज तुमची आर्थिक बाजू भक्कम राहील. आपल्या जोडीदाराचे मन जपण्याच्या आज तुम्ही प्रयत्न कराल.

धनु – (शुभ रंग- सोनेरी)

कार्यक्षेत्रातील तुमच्या प्रगतीचा आलेख उंचावेल. नवीन आव्हाने आत्मविश्वासाने स्वीकाराल. जोडीदाराला अभिमानास्पद वाटणारी कामगिरी तुमच्या हातून आज होईल.

मकर-  (शुभ रंग- लाल)

काटकसरी वृत्तीला लगाम घालून काही अत्यावश्यक खर्च तुम्हाला आज करावेच लागतील. घरात थोरांच्या होला हो करून वाद आवरते घ्या. प्रवासात तब्येतीस जपा.

कुंभ – (शुभ रंग- जांभळा)

एखाद्या नवा उपक्रम सुरू करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. नोकरदारांच्या रास्त मागण्या वरिष्ठ मान्य करटिल.

मीन – ( शुभ रंग- तांबडा)
कार्यक्षेत्रातील अति व्यस्ततेमुळे आज तुम्हाला कुटुंबीयांची नाराजी पत्करावी लागेल. नोकरदरांना वरिष्ठांच्या मागे पुढे करावेच लागेल अतिव्यस्त दिवस.

श्री जयंत कुळकर्णी.

ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार.

फोन 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.