Katraj : अखेर 48 तासांनी बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद; प्रशासनाला यश

एमपीसी न्यूज : अखेर 48 तासानंतर (Katraj) कात्रज प्राणी संग्रहालयातील बिबट्याला जेरबंद करण्यात प्रशासनाला यश आले आहे. बिबट्या सापडल्याने सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला आहे. अखेर रात्री सव्वा नऊच्या दरम्यान बिबट्या एका पिंजऱ्यात अडकला. 

 

बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या. त्याच्या हालचाली टिपणाऱ्या वेगवेगळ्या कॅमेऱ्यासह खाद्य टाकून 9 पिंजरे लावण्यात आले होते. अखेर तो एका पिंजऱ्यात अडकला.

 

Facebook Instagram Down : फेसबुक, इंस्टाग्राम डाऊन

सविस्तर माहिती अशी, की कात्रज येथील (Katraj) राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातून नर जातीचा (Pune) बिबट्या काल (दि. 04)  पसार झाला होता. एक दिवस उलटूनही त्याचा शोध लागत नव्हता. त्यामुळे संग्रालय कालपासून पर्यटकांसाठी बंद करण्यात आले होते. तो संग्रहालयाच्या विविध कॅमेरातून दिसत होता. त्यामुळे तो उद्यानाबाहेर गेला नाही हे मात्र ठाम होते.

बिबट्याला शोधण्यासाठी अग्निशमन दलासह विविध पथके तैनात करण्यात आले होते. या सर्वांच्या शोधमोहिमेला यश आले आहे.

 

  

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.