Facebook Instagram Down : फेसबुक, इंस्टाग्राम डाऊन

एमपीसी न्यूज – फेसबुक आणि इंस्टाग्राम मंगळवारी (दि. 5) सायंकाळी अचानक डाऊन (Facebook Instagram Down)झाले. याबाबत कंपनीकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नाही. मात्र या बिघाडामुळे नेटकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

 

फेसबुक आणि इंस्टाग्राम हे दोन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एकाच कंपनीचे प्रॉडक्ट आहेत. मंगळवारी सायंकाळी अचानक फेसबुक लॉग आऊट झाले. प्रत्येकाच्या मोबाईलवर फेसबुक उघडताच लॉगिन करण्याचा इशारा आला.

मात्र फेसबुकवर लॉगिन केले असता लॉगिन होऊ शकले नाही. आपल्याच मोबाईल मध्ये बिघाड झाल्याचा अनेकांचा समज झाला. परंतु ही अडचण फेसबुक कंपनीकडून झाली आहे.

Katraj : बिबट्याला पकडण्यासाठी जागोजागी पिंजरे; अजूनही शोधमोहीम सुरूच

हाच प्रकार instagram च्या बाबतीत देखील झाला. instagram ॲप्लिकेशन सुरू झाले. मात्र ते रिफ्रेश करता येऊ शकणार नसल्याचे नोटिफिकेशन येत आहेत. त्यामुळे इंस्टाग्रामवर मर्यादित स्क्रोल अप केल्यानंतर इंस्टाग्राम देखील रिफ्रेश होईना झाले. जगप्रसिद्ध असलेले दोन्ही सोशल मिडियाचे सर्व्हर डाऊन झाल्याने नेटकरी चांगलेच संतापले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.