Katraj : बिबट्याला पकडण्यासाठी जागोजागी पिंजरे; अजूनही शोधमोहीम सुरूच

एमपीसी न्यूज : कात्रज येथील (Katraj) राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातून नर जातीचा (Pune) बिबट्या काल (दि. 04)  पसार झाला आहे. अद्याप त्याचा काहीही पत्ता लागलेला नाही. त्याची शोधमोहीम अजूनही चालू आहे. त्याला पकडण्यासाठी जागोजागी खाद्य टाकून असे पिंजरे लावून ठेवले आहेत. जेणेकरून तो पिंजऱ्यात अडकेल. 

कात्रज येथील प्राणिसंग्रहालयात विविध प्रकारचे प्राणी आढळतात. काही दिवसांपूर्वी त्यामध्ये चौशिंगे, तरस आणि बिबट्या या प्राण्यांची भर पडली होती. या प्राणिसंग्रहालयात चार बिबटे असून, त्यातील तीन मादी आहेत.   हा पसार झालेला  बिबट्या कर्नाटकमधील हंपी येथील अटलबिहारी वाजपेयी प्राणिसंग्रहालयातून आणण्यात आला होता. प्राण्यांच्या अनाथालयात काही दिवसांपासून त्याला विलगीकरणात ठेवण्यात आले होते.

Pune : आयुष्मान भारत योजना रुग्णांच्या नव्हे तर विमा कंपन्यांच्या भल्यासाठी – प्रशांत जगताप

मात्र, सोमवारी सकाळी साधारणतः साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पिंजऱ्यामध्ये बिबट्या नसल्याचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले.पिंजऱ्याच्या वरच्या बाजूची सळई उचकटून तो प्रसार झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे (Katraj) प्राणी संग्रहालयाचे संचालक राजकुमार जाधव यांनी सांगितले. बिबट्या पसार झाल्याचे लक्षात आल्यानंतर तो पसार झालेला भाग पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला. मात्र, पूर्ण प्राणी संग्रहालय बंद करण्यात आले नव्हते.

बिबट्याला शोधण्यासाठी अग्निशमन दलासह विविध पथके तैनात करण्यात आले आहे. आज दोन दिवस होत आले असून शोधू मोहीम अजूनही सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.