Pune: मोदी सरकारच्या युवक कल्याणासाठी केलेली कामगिरी मतदारांपर्यंत पोहोचवा – मुरलीधर मोहोळ

एमपीसी न्यूज – युवा मोर्चाने नव मतदारांपर्यंत पोहोचून मोदी सरकारच्या (Pune)युवक कल्याणासाठी केलेली कामगिरी पोचवावी , असे आवाहन माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले. 
भारतीय जनता युवा मोर्चाच्या शिवाजीनगर विधानसभेतील पदाधिकाऱ्यांना(Pune) नियुक्तीपत्र वितरण मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे उपस्थित होते. या दरम्यान कार्यकर्ता मेळावाही आयोजित करण्यात आला होता.
यावेळी नवीन पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सक्रियपणे पार्टीसाठी योगदान द्यावे, असे आवाहन मोहोळ यांनी केले.
दरम्यान, आगामी पुणे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोहोळ यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले आहे. त्यांचे नाव सध्या आघाडीवर आहे. दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर ही निवडणूक होणार आहे. येत्या काही दिवसातच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.