Pune: पुण्यातल्या महिला नेहमी काहीतरी वेगळं करतात – अमृता फडणवीस 

एमपीसी न्यूज – महिलां छान नटून थटून आल्या आहेत. पुण्यातल्या महिला (Pune)नेहमी काहीतरी वेगळं करतात. त्यामुळं छान वाटत आहे. आज एक चांगला दिवस आहे. या कार्यक्रमामुळे महिलामध्ये पूर्ण एनर्जी भरली आहे. तुमच्या खेळातूनही तुमचा भारी पणा दिसून येतोय. तुमचा खेळ पाहून मलाही खेळ खेळावासा वाटत होता, असे गायिका आणि सामाजिक कार्यकर्त्या अमृता फडणवीस म्हणाल्या. 
लोकमान्य नगर- नवी पेठ, द हिंदू फाउंडेशन आणि माजी नगरसेवक धनंजय विष्णू जाधव (Pune)यांच्या वतीने आयोजित, पुणे कला, क्रीडा, सांस्कृतिक महोत्सवामध्ये हळदी कुंकू आणि होम मिनिस्टर अर्थात “खेळात रंगली पैठणी” या लाखो रुपयांच्या बक्षीसांचा वर्षाव असलेला कार्यक्रम, अभिनेत्या, गायिका आणि सामाजिक कार्यकर्त्या अमृता फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला.
या महिला एकत्रीकरण सांस्कृतिक कार्यक्रमात चार हजार महिला उपस्थित होत्या.
लोकमान्य नगर जॉगिंग पार्क येथे झालेल्या या खेळ, गाणी, नृत्य अशा कार्यक्रमा मध्ये अनेक महिलांनी सहभाग घेतला आणि बक्षिसे जिंकली.
अमृता फडणवीस म्हणाल्या, आपली महाराष्ट्रीयन पैठणी जग प्रसिद्ध आहे. पूर्वी चीनमधून रेशीम यायचे पण आता बेंगलोर मधूनच आपल्याला आपल्या देशातून रेशीम मिळते. त्यामुळे मेक इन इंडिया हा फुल फॉर्म पूर्ण होतो. हा आहे आपला नवीन भारत जिकडे पाहाल तिकडे प्रगती दिसत आहे.
आपल्या प्रत्येक महिलेला असे वाटते की, आपल्याकडे पैठण्या असाव्यात, आपल्याला आपले पती किंवा जिवलग पैठणी घेतात. पण या कार्यक्रमात भाग घेउन तुम्ही पैठण्या जिंकल्या त्या बाबत छान वाटते.
महिलांचे एकत्रिकरण आणि सांस्कृतिक कार्यक्रम गेले अनेक वर्ष द हिंदू फाउंडेशन करत आहे. महिलांच्या सबलीकरणा करिता  करत असलेल्या अनेक उपक्रमाची तसेच संयोजकांनी ठेवलेल्या बक्षीसांची प्रशंसा केली.
अमृता फडणवीस यांना पत्रकारांनी पुण्यातील महिलां विषयी काय वाटते, असे विचारल्यावर त्यांनी त्वरित पुणे कि नारी सबसे भारी असे उद्गार काढले.
सोन्याचा दागिन्या साठी काढलेल्या लकी कुपन मधून एक तोळ्याचा अस्सल सोन्याचा नेकलेस रूपाली शिंदे यांना मिळाला. विविध खेळां मधून विजेत्या झालेल्या ६ महिलां मध्ये फायनल घेण्यात आली.
फायनल खेळात अनुक्रमे क्रमांक 1 ते 6  विजेत्या आणि त्यांना मिळालेली बक्षिसे.
पहिला क्रमांक-  क्षितिजा खेळगे – 280लिटर डबल डोअर फ्रिज.
दुसरा क्रमांक क्रमांक- कल्पना इंगळे- ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन.
तिसरा क्रमांक- आशा हरपुडे –  42इंची स्मार्ट टीव्ही.
चौथा क्रमांक – पल्लवी वाघमारे- 32इंची स्मार्ट टीव्ही.
पाचवा क्रमांक- दीप्ती बनकर – मिक्सर ग्राइंडर ज्यूसर फूड प्रोसेसर.
सहावा क्रमांक – मनीषा मते – इंडक्शन.
बक्षिसे स्वीकारताना या विजेत्या महिला अक्षरशः भाराऊन गेल्या होत्या. 25 पैठण्यासाठी भाग्यवंत महिलांच्या नावांची काही लकी कुपन अमृता फडणवीस यांच्या हस्ते काढण्यात आली.
या लकी कुपन निघालेल्या भाग्यवंत महिलांना अमृता फडणवीस यांच्या हस्ते पैठण्या देण्यात आल्या. प्रथमच आपल्याला एवढ्या मोठ्या स्टेजवर आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते अस्सल पैठणी बक्षीस मिळतेय म्हूणन भारावल्या होत्या.
या प्रसंगी कला क्षेत्रात आपल्या अभिनयाने आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या, देव माणूस फेम गायत्री बनसोडे, साकाव, सफरचंद मूवी फेम वैभवी चव्हाण आणि ढीशक्याव मूवी फेम मेघा शिंदे यांना अमृता फडणवीस यांच्या शुभ हस्ते कला गौरव पुरस्कार २०२४ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सन्मानचिन्ह, शाल, प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.
पुरस्कार वितरण समारंभाचे सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले. खेळातून विजेत्या ठरलेल्या 1ते 6 विजेत्या महिलांना पुणे मनपा माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर, भाजपा प्रदेश प्रवक्ते कुणाल टिळक, भाजप कसबा मंडल अध्यक्ष राजेंद्र काकडे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
या प्रसंगी भाजपा व्यापारी आघाडी अध्यक्ष उमेश शहा, माजी नगरसेविका सुशीला नेटके, अश्विनी पवार, सुनीता जंगम, दिव्या लोळगे उपस्थित होते.
होम मिनिस्टर “अर्थात खेळात रंगली पैठणी” या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लाडके भाऊजी अभिजित राजे यांनी केले. महोत्सवाचे संयोजन माजी नगरसेवक धनंजय विष्णू जाधव आणि जयश्री जाधव यांनी केले.
महोत्सव यशस्वी करण्यासाठी रवींद्र कांबळे, शिवाजी लोहकरे, तुषार ढावरे, अमन करडे, सीमा शिंदे, संध्या निकम, वनिता सोपे, मालती शिंदे, नीता भिसे, निलम चव्हाण यांनी कष्ट घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.