Pune : शेतीआधी शेतकरी समजून घ्यावा लागतो – गणेश सुरवसे

एमपीसी न्यूज – शेतकरी हा खऱ्या अर्थाने जगाचा (Pune) अन्नदाता आहे. हा बळीराजा जगला तरच आपण सर्वजण जगू शकतो. परंतु, परिस्थितीनुरूप पारंपरिक शेतीत बदल न केल्यामुळे शेतकरी आता मागास होत चालला आहे. अवकाळी पाऊस व त्यामुळे हातातोंडाशी आलेल्या पिकांचे झालेल्या नुकसानातून आलेल्या कर्जबाजारीपणामुळे बळीराजा आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतो. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी खरंच काही करायचे असेल तर शेतीआधी शेतकरी समजून घ्यावा लागेल, असे प्रतिपादन हवेली विभागाचे कृषीअधिकारी गणेश सुरवसे यांनी व्यक्त केले.

ते एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या स्कुल ऑफ फुड टेक्नॉलॉजीतर्फे आयोजित वाडेबोल्हाई ग्राम दत्तक योजनेच्या कार्यक्रमात बोलत होते. याप्रसंगी, स्कुल ऑफ फुड टेक्नॉलॉजीच्या प्राचार्या डॉ.अंजली भोईटे, वाडेबोल्हाई गावच्या लोकनियुक्त सरपंच वैशाली केसवड, उपसरपंच सुमित शिंदे, ग्रामसेवक संतोष भोसले, उपक्रमाच्या संयोजक डॉ.सुजाता घोडके, समन्वयक डॉ.गणेश भावसार, डॉ.निलेश कर्डिले व विद्यार्थी हजर होते.

Pune : वनरक्षक, वनपाल व वनमजूरांच्या समस्या निकाली काढण्याबाबत मुख्य वनसंरक्षक प्रवीण यांची ग्वाही

सुरवसे यांनी या प्रसंगी बोलताना विद्यार्थ्यांना उस, डाळी प्रक्रिया उद्योग, शेतीतील नवतंत्रज्ञान, शेतकऱ्यांना सध्या भेडसावणाऱ्या समस्या याबद्दल इत्यंभूत माहिती दिली. तसेच त्यांनी याप्रसंगी शेतकऱ्यांसाठी भारत सरकारकडून राबविल्या (Pune) जाणाऱ्या विविध योजनांची माहितीही गावाकऱ्यांसह विद्यार्थ्यांना करून दिली.

याप्रसंगी बोलताना डॉ.भोईटे यांनी स्कुल ऑफ फुड टेक्नाॅलाॅजीतर्फे शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पाबद्दल माहिती दिली. त्या म्हणाल्या, स्कुल ऑफ फुड टेक्नलॉजी ने ग्राम दत्तक योजना व या श्रमशिबिराला आपल्या अभ्यासक्रमात स्थान दिले आहे. त्यामुळे गेल्या चार वर्षांपासून न चुकता ग्राम दत्तक उपक्रमाचे आयोजन जाते. यंदा शेवटचे वर्ष असून या उपक्रमाच्या माध्यमाधून विद्यार्थी अनेक लोकउपयोगी उपक्रम हाती घेऊन शेतकऱ्यांशी संवाद साधतात. आठ दिवसांच्या या श्रमशिबिरातून आमच्या विद्यार्थ्यांना शेती जवळून अनुभवण्याची संधी मिळते.

याप्रसंगी, सरपंच केसवड व उपसरपंच शिंदे यांनीही मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांच्या सर्व उपक्रमांना पाठींबा दर्शविला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.