Chinchwad : एमडी ड्रग्स प्रकरणातील उपनिरीक्षक शेळके यांचे अनेक प्रताप उघड

आरोपीला अटक न करण्यासाठी मागितले होते साडेतीन लाख रुपये

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरातील एमडी ड्रग्स प्रकरणात अटकेत (Chinchwad)असलेल्या पोलीस उपनिरीक्षक विकास शेळके याचे अनेक प्रताप उघडकीस येत आहेत.

त्याने लपवलेले एमडी ड्रग्सचे पोते, ड्रग्स विक्रीसाठी हॉटेल कामगाराची निवड, कार मध्ये लपवलेले ड्रग्स, महिन्याभरापूर्वी एका गुन्ह्यातील आरोपीला अटक न करण्यासाठी मागितलेली भली मोठी रक्कम असे अनेक प्रकार केल्याचे समोर येत आहे.

मागील महिन्यात न्यायालयाच्या आदेशानुसार दाखल करण्यात आलेल्या(Chinchwad) फसवणूकीच्या गुन्ह्यातील आरोपीला शेळके याने नाशिक फाटा येथील उड्डाणपुलाखाली बोलावून घेतले. त्यानंतर आरोपीचा मोबाईल काढून घेत अटक न करण्यासाठी त्याच्याकडे साडेतीन लाख रुपयांची मागणी केली.

याबाबत संबंधित आरोपीने तक्रार केली होती. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता तक्रारीमध्ये तथ्य असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात शेळके याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

Pune: पाण्याचे थकीत बील भरले नाही तर पुणे महापालिका बिलावर आकारणार प्रतिमहिना 1 टक्के व्याज

उपनिरीक्षक विकास शेळके आणि नमामी शंकर झा या दोघांना एमडी ड्रग्स विक्रीसाठी बाळगल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. नुकतेच पोलिसांनी शेळके याच्या कार मधून दोन किलो 400 ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त केले आहे.

सांगवी परिसरात सुरुवातीला नमामिझा याला दोन कोटींचे ड्रग्स जवळ बाळगल्या प्रकरणी अटक करण्यात आली. तपासात झा याने निगडी पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेल्या पोलीस उपनिरीक्षक शेळके याचे नाव घेतले. त्याबाबत तपास केल्यानंतर शेळके याला देखील अटक करण्यात आली. यामध्ये दुसऱ्या टप्प्यात पोलिसांनी 44 किलो 790 ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त केले. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात पोलिसांनी आणखी दोन किलो 400 ग्रॅम ड्रग्स शेळके याच्या कारमधून जप्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.