Pune: पाण्याचे थकीत बील भरले नाही तर पुणे महापालिका बिलावर आकारणार प्रतिमहिना 1 टक्के व्याज

एमपीसी न्यूज –  पुणे महापालिका मीटरद्वारे पाणी बीलाची आकारणी(Pune) करते. हेच थकीत बील 31 मार्च पर्यंत भरले नाही तर पुणे महापालिका 1 टक्के व्याजदर या बिलावर आकारणार असल्याचे पुणे महापालिकेने जाहीर केले आहे.

महापालिकेने जाहीर केलेल्या प्रगटनानुसार खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड(Pune) व पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड येथे ही व्यावसायीक व  निवासी ग्राहकांना मिटरद्वारे पाणी पुरवठा केला जातो. यामध्ये महापालिका पाणी बिलावर कोणतेही व्याज आकारत नाही. त्यामुळे पाणी बीले थकली आहेत.

 

याच बिलांच्या वसूलीसाठी महालिकेने 60 दिवसांचा कालावधी दिला होता.  1 जानेवारी ते 31 मार्च असा तो कालावधी होता. त्यामुळे 1 एप्रिल 2024 पासून पाणी बीलावर 1 टक्के व्याज आकारले जाणार आहे.

 

 

Wakad: भरधाव टेम्पोची पादचारी दाम्पत्यास धडक; महिलेचा मृत्यू

ग्राहकांनी बीले न मिळाल्यास 31 जानेवारी पर्यंतचे पाण्याचे मीटर बील लष्कर पाणीपुरवठा विभाग, स्वारगेट पाणीपुरवठा विभाग, एसएनडीटी चतुःश्रृंगी पाणीपुरवठा विभाग येथून घ्यावीत असे आवाहन महापालिकेने केले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.