Pune : वनरक्षक, वनपाल व वनमजूरांच्या समस्या निकाली काढण्याबाबत मुख्य वनसंरक्षक प्रवीण यांची ग्वाही

एमपीसी न्यूज – मुख्य वनसंरक्षक पुणे यांचा (Pune) कार्यालयीन दालनात वनरक्षक, वनपाल व वनमजूर यांचा सेवा विषयक तक्रार निवारण सभा म. रा. वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेचे शिष्टमंडळसह केंद्रीय अध्यक्ष अजय पाटील यांचा नेतृत्वात पार पडली. संघटनेचा निवेदनातील प्रत्येक मुद्द्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यावर तात्काळ सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण यांनी दिली.

तक्रार निवारण सभेत विभागीय चौकशी व निलंबन प्रकरणे निकाली काढणे, ऑनलाईन बदली प्रक्रिया राबविणे जेणेकरून क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल, कर्मचाऱ्यांची सेवापुस्ताक अद्यावत करणे, प्रवास भत्ता, वेतनवाढी ची थकबाकी, वैद्यकीय देयकांना अनुदान उपलब्ध करून देणे, ऑनलाईन बदली प्रकिया राबविणे, प्रत्येक महिन्याचा पाच तारखेच्या आत पगार होणे, कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक अद्यावत करणे, अशा अनेक मुद्यांवर चर्चा करण्यात आली.

Chakan: चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत दारू भट्टीवर गुन्हे शाखेचा छापा

वनक्षेत्राचे पक्के सीमांकन व नकाशे तयार करून मिळणे, गोपनीय अहवाल, वन क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचा विमा काढणे, वन कल्याण निधी बाबत, घर बांधणी, वाहन व संगणक अग्रीम बाबत, तपासणी नाका व निवासस्थानाची दुरुस्ती व नवीन बांधकाम करणे बाबत, नियमित गणवेश पुरवठा करणे बाबत, कॅशलेस वैद्यकीय सुविधा पुरविणे बाबत, नियत वनरक्षकांना नियमित बीट मदतनीस देणेबाबत, संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या खात्यात योजना व योजनेत तर कामाचा निधी वर्ग न करणेबाबत, वनरक्षक वनपालांच्या एकापाल्यास भरती प्रक्रियेत प्राधान्य देणे बाबत, क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना गस्ती करण्यासाठी शासकीय मोटार सायकल वाहनाचा पुरवठाकरणे बाबत, वन वनवा नियंत्रण याबाबत अद्यावत तंत्रज्ञान विकसित करून उपाययोजना (Pune) करण्याबाबत, अतिक्रमण नियंत्रणात आणण्याकरिता उपग्रह प्रणालीचा वापर करणे याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली, मुख्य वनसंरक्षक पुणे यांनी सर्व समस्या व त्यावरील समाधान याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले.

या तक्रार निवारण बैठकीस उपवनसंरक्षक महादेव मोहिते, उपवनसंरक्षक जुन्नर अमोल सातपुते, उपवनसंरक्षक सोलापूर धैर्यशील पाटील, विभागीय वन अधिकारी कॅम्पा राम धोत्रे, सहाय्यक वनसंरक्षक शितल राठोड ई. वन अधिकारी उपस्थित होते.

संघटनेच्या शिष्टमंडळात केंद्रीय उपाध्यक्ष विशाल मंत्रीवार, शिबसांब घोडके, बि. एम. बुरुंगले, प्रीती नागले,अर्चना कोरके,अश्विनी देशमुख, प्रिया बुरा, मनोज पारखे, गणेश धूळशेट्टी, के. पी. देठे, के एम हिमोणे, समीर जाधव, वैभव कंक, योगेश तिकडे, विशाल अडागळे, सुलतान शेख, सुरेश बरले, पांडुरंग कोपनर इत्यादी सभासद उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.