Maval : खांडी येथे ‘सर्पदंश प्रतिबंध आणि त्यांचे अन्नसाखळीतील महत्त्व’ विषयावर जनजागृती शिबिर

एमपीसी न्यूज – वनपरिक्षेत्र शिरोता वनविभाग पुणे (Maval) आणि द काॅर्बेट फाऊंडेशन मुंबई, एचडीएफसी बॅंक परिवर्तन यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वांगीण ग्रामीण विकास कार्यक्रम अंतर्गत ‘सर्पदंश प्रतिबंध, त्यांचे अन्नसाखळीतील महत्व व त्यांचे संवर्धन’ या विषयावर जनजागृती शिबिर घेण्यात आले.

मुख्यवनसंरक्षक प्रविण एन आर, उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक मयुर बोठे, वनपरिक्षेत्र अधिकारी शिरोता सुशील मंतावर यांच्या नेतृत्वात ‌हा कार्यक्रम घेण्यात आला. मावळ तालुक्यातील खांडी येथे हे मार्गदर्शन शिबिर झाले.

यावेळी सुशील मंतावार, वनपरिक्षेत्र अधिकारी शिरोता, दत्ता जाधव दिव्यांशू पवार, चेतन धरणे, प्रशांत कुंभार, आशिष ठोके, सखाराम बुचडे, लालासाहेब वाघापुरे, राणी ढोले आदी उपस्थित होते.

Alandi : शासकीय रुग्णालयात नोकरी लावण्याच्या आमिषाने एक लाखाची फसवणूक

क्षेत्र समन्वयक राहुल कांबळे यांनी ग्रामस्थांमध्ये जनजागृती केली. तसेच मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी ग्रामस्थांना 120 (Maval) बॅटरींचे (टॉर्चचे) वाटप करण्यात आले. द कॉर्बेट फाऊंडेशन मुंबई, एचडीएफसी बॅंक परिवर्तन यांच्या सहकार्याने मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी व नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी मावळ तालुक्यातील अनेक गावांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुशील मंतावार यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.