Alandi : शासकीय रुग्णालयात नोकरी लावण्याच्या आमिषाने एक लाखाची फसवणूक

एमपीसी न्यूज – शासकीय रुग्णालयात (Alandi) शिपाई पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची एक लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना 21 जुलै ते 17 ऑगस्ट या कालावधीत बोपखेल पुणे, भिंगार अहमदनगर आणि आळंदी ग्रामीण रुग्णालयात येथे घडली.

सागर शिवराम आगवान (वय 30, रा. बोपखेल, पुणे) यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रद्युम्न  चव्हाण (वय 27, रा. इंदापूर, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chikhali : सोसायटीच्या पार्किंगमधून रिक्षा चोरीला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांना आळंदी ग्रामीण रुग्णालयात शिपाई पदावर नोकरी लावण्याचे (Alandi) आमिष दाखवले. त्यासाठी आरोपीने फिर्यादी यांच्याकडून 30 हजार रुपये ऑनलाईन आणि 70 हजार रुपये रोख स्वरूपात घेतले.

त्यानंतर आरोपीने फिर्यादी यांना खोटा नियुक्ती आदेश देखील दिला. मात्र फिर्यादी नोकरीवर रुजू होण्यासाठी गेले असता हा प्रकार उघडकीस आला. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.