Moshi : आर्थिक मदतीच्या आमिषाने महिलेची 16 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – महिलेला आर्थि मदत (Moshi) करण्याचे आमिष दाखवून अनोळखी व्यक्तींनी महिलेची 16 लाख 62 हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना 7 ते 18 जानेवारी 2023 या कालावधीत मोशी प्राधिकरण येथे घडली.

याप्रकरणी 32 वर्षीय महिलेने 9 सप्टेंबर रोजी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 447917823745, 447469349281 या क्रमांकावरून मीडिया वापरणारी केल्विन पॅट्रिक नावाची व्यक्ती आणि 8794640457 या क्रमांकावरून बोलणारी टीनिया नावाची व्यक्ती यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी केल्विन याने फिर्यादी यांच्याशी सोशल मीडियावरून संपर्क केला. फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून त्यांना आर्थिक मदत करण्याचे आमिष दाखवले.

Chikhali : सोसायटीच्या पार्किंगमधून रिक्षा चोरीला

त्यानंतर त्यांच्याशी सातत्याने संपर्क करत (Moshi) आरोपी टीनिया याने तो फॉरेस्ट डिपार्टमेंट दिल्ली येथून बोलत असल्याचे भासवून वेगवेगळ्या कारणांसाठी फिर्यादीकडून 16 लाख 62 हजार रुपये घेतले. ते पैसे फिर्यादी यांना परत न करता त्यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.