Chikhali : सोसायटीच्या पार्किंगमधून रिक्षा चोरीला

एमपीसी न्यूज – सोसायटीच्या (Chikhali) पार्किंगमध्ये पार्क केलेली रिक्षा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना गुरुवारी (दि. 7) पहाटे त्रिवेणीनगर तळवडे येथील अलंकार हाऊसिंग सोसायटी येथे उघडकीस आली.

सचिन लक्ष्मण भोसले (वय 34, रा. अलंकार हाऊसिंग सोसायटी, त्रिवेणीनगर, तळवडे) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Hinjawadi : कार घासल्याच्या कारणावरून टोळक्याकडून एकास बेदम मारहाण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी (Chikhali) यांनी त्यांची 70 हजार रुपये किमतीची रिक्षा (एमएच 14/जीसी 4228) त्यांच्या सोसायटीच्या पार्किंग मध्ये पार्क केली होती. बुधवारी रात्री साडेअकरा ते गुरुवारी पहाटे पाच वाजताच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी यांची रिक्षा चोरून नेली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.