Maval : जनसंघाचे माजी अध्यक्ष डॉ. बाळकृष्ण नाईक यांची बारणे यांनी घेतली भेट

एमपीसी न्यूज- भारतीय जनसंघाचे पिंपरी चिंचवड शहर माजी अध्यक्ष डॉ. बाळकृष्ण नाईक यांची चिंचवड येथील निवासस्थानी शिवसेना-भाजप-रिपाई-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी भेट घेतली.

यावेळी जिल्हाध्यक्ष गजानन चिंचवडे, उमेश गोलांडे, महेश कुलकर्णी, चेतन गावडे, ज्योती नाईक आदी उपस्थित होते.

डॉ. बाळकृष्ण नाईक हे मूळचे अहमदनगर येथील आहेत. त्यांनी कामशेत आणि पिंपरी येथे प्रॅक्टिस केली. 1973 ते 1975 दरम्यान त्यांनी भारतीय जनसंघ पिंपरी चिंचवड शाखेचा अध्यक्ष म्हणून पदभार सांभाळला. 1980 साली भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली. त्यावेळी त्यांनी पिंपरी चिंचवड शहराचे भारतीय जनता पार्टीचे पाहिले अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले. शिवसेना-भाजप-रिपाई-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी डॉ. नाईक यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

समाजकारण आणि राजकारणावर दोघांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. देशाच्या सतराव्या लोकसभेची निवडणूक आली असून या निवडणुकीच्या प्रचारात मदत करणार. खासदार बारणे उमेदवार म्हणून सगळीकडे पोहोचू शकत नाही. त्यामुळे सगळ्या कार्यकर्त्यांनी जबाबदारी घेऊन त्यांचे काम लोकांपर्यंत पोहोचवायला हवे, असे म्हणत डॉ. नाईक यांनी बारणे यांना शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.