Chikhali : जुन्या वादातून विष पाजून मारण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज- जुन्या वादातून एकाला शीतपेयामधून विषारी औषध पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी शुक्रवारी (दि.5) चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी मिलिंद डांगरे (रा.पिंपळे निलख) असे विषप्रयोग झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी त्यांची पत्नी जयश्री डांगरे (वय 34) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विकास अनंत ढोले (रा.हडपसर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी जयश्री यांच्याबद्दल चुकीचे बोलण्यावरून त्यांचे पती मिलिंद व आरोपी यांचे काही दिवसांपूर्वी वाद झाले होते. याच राग मनात धरून एका आठवड्यापूर्वी (दि.1) आरोपी व फिर्यादी यांचे पती भेटले असता आरोपीने त्यांना शीतपेयातून विषारी औषध दिले. यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. हा प्रकार समजला असता पत्नी जयश्री यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चिखली पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक महेंद्र आहेर अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.