Tathawade : चाकूच्या धाकाने टोळक्याने पळविला डंपर

एमपीसी न्यूज- गोडाऊनमध्ये जबरदस्तीने प्रवेश करून टोळक्याने चाकूचा धाक दाखवत मोबाईल आणि डंपर असा 7 लाखांचा ऐवज चोरून नेला. ताथवडे येथील पवार वस्ती परिसरात बुधवारी (दि.3) रात्री साडे आकाराच्या सुमारास ही घटना घडली.

या प्रकरणी बाळू हरी नेहतराम (वय 35, रा.ताथवडे) यांनी फिर्याद दिली असून चार जणांच्या टोळक्यावर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेहतराम हे बुधवारी रात्री गोडाऊनमध्ये असताना आरोपी टोळके त्याठिकाणी आले. त्यांना तसेच त्यांच्या कुटुंबियांना मारहाण केली. तसेच चाकूचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्या मुलीचा मोबाईल आणि गोडाऊनमधील अशोक लेलॅण्ड डंपर असा 7 लाख 6 हजार रुपयांचा ऐवज चोरून पोबारा केला. जात असताना गोडाऊनमधील सीसीटीव्ही कॅमेरे फोडून नुकसान केले. हिंजवडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.