Pimpri : गोडाऊनची भिंत फोडून पाऊण लाख लंपास

एमपीसी न्यूज- भंगार मालाच्या गोडाऊनची भिंत फोडून तीन चोरटयांनी पाऊण लाखांची रोकड लंपास केली. शुक्रवारी (दि.5) पहाटे अडीचच्या सुमारास पिंपरीतील जय भवानी स्क्रॅप सेंटरमध्ये ही घटना घडली.

या प्रकरणी दौलत दिवाराम चौधरी (वय 35,रा.इंदिरानगर,भोसरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कुलदीप युवराजसिंग जून्नी (वय 19, रा.शिवाजीनगर), आकाश गौड (वय 20), सुरज टाक (वय 19, दोघे रा.भटनागर, पिंपरी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी चौधरी यांचे पिंपरी पुलाखाली जय भवानी स्क्रॅप सेंटर नावाचे भंगार मालाचे गोडाऊन आहे. आरोपींनी आपसात संगनमत करून शुक्रवारी पहाटे गोडाऊनची भिंत फोडून आत प्रवेश केला. गोडाऊनमधील 81 हजार रुपयांची रोकड चोरून पोबारा केला. या प्रकरणी शुक्रवारी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून उपनिरीक्षक अशोक निमगिरे अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.