Bhosari : ड्रेस फाडून महिलेचा विनयभंग; आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज- घरात जबरदस्तीने प्रवेश करून महिलेचा ड्रेस फाडून विनयभंग कारण्याऱ्याला भोसरी पोलिसांनी अटक केली. शुक्रवारी (दि.5) दुपारी अडीच वाजताच्या सुमारास कासारवाडी परिसरात ही घटना घडली.

या प्रकरणी एका 25 वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, सचिन शिवाजी लांडगे (रा.कासारवाडी) याला अटक करण्यात आली आहे.

आरोपी लांडगे याने शुक्रवारी दुपारी फिर्यादी यांच्या घराचा दरवाजा वाजवून घरात जबरदस्तीने प्रवेश केला. फिर्यादी यांना शिवीगाळ करून संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादी यांचा ड्रेस फाडून लगट करण्याचा प्रयत्न केला. महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली असता आरोपीवर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. भोसरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.