Chikhali : किरकोळ कारणावरून पतीकडून पत्नीला बॅटने मारहाण, मुलीने केली पोलिसांत तक्रार

एमपीसी न्यूज – किरकोळ कारणावरून (Chikhali) पतीने शिवीगाळ करत पत्नीला बॅटने मारहाण केली. याप्रकरणी मुलीने थेट वडिलांच्या विरोधात चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा सारा प्रकार बुधवारी (दि.12) नेवाळे वस्ती, चिखली येथे घडली आहे.

याप्रकरणी 19 वर्षीय मुलीने दिलेल्या तक्रारीवरून 48 वर्षीय वडिलावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

Moshi : पतीच्या जाचाला कंटाळून पत्नीची आत्महत्या, पतीला अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या आईने वडिलांना घरातील किरकोळ कारणावरून हटकले म्हणून आरोपीने जीवे मारण्याची धमकी देत, घरातील लाकडी बॅटने डोक्यात तसेच हातावर मारून गंभीर जखमी केले आहे. या विरोधात चिखली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.