Chinchwad : सहायक पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील (Chinchwad) तीन सहायक पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. याबाबतचे आदेश पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी गुरुवारी (दि. 14) दिले आहेत.

सहायक पोलीस आयुक्त सचिन हिरे यांच्याकडे पिंपरी विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर भोसरी एमआयडीसी विभागाचा अतिरिक्त कार्यभार सहायक आयुक्त सचिन हिरे यांच्याकडे असणार आहे. गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सतीश माने यांची विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे. यापूर्वी सहायक आयुक्त माने यांच्याकडे विशेष शाखेचा अतिरिक्त कार्यभार होता.

Chikhali : किरकोळ कारणावरून पतीकडून पत्नीला बॅटने मारहाण, मुलीने केली पोलिसांत तक्रार

तर वाकड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्याकडे गुन्हे (Chinchwad) शाखेचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. मागील दोन दिवसांपासून आयुक्तालयात बदल्यांचे सत्र सुरु आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही तयारी केली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.