Pimpri : महात्मा फुले पुतळा नुतनीकरणासाठी सव्वा दाेन काेटींचा खर्च

एमपीसी न्यूज – पिंपरी येथील महात्मा फुले पुतळा (Pimpri) परिसराच्या नूतनीकरणाच्या कामाला गती येणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने दोन कोटी 35 लाख 29 हजार रुपयांचा निधी या कामासाठी मंजूर केला आहे. विद्युतची कामे करण्यासाठी हा निधी मंजूर केला आहे.

शहरातील फुले, शाहू, आंबेडकर अनुयायांच्या मागणीनुसार पिंपरी येथे महात्मा फुले यांच्या पुतळ्याशेजारी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येत आहे. या कामासाठी 2022 मध्ये सुमारे 9 कोटी 66 लाख 38 हजार रुपयांच्या खर्चास तत्कालीन स्थायी समितीच्या सभेत मान्यता देण्यात आली होती. तसेच या पुतळ्याच्या मागे प्रेरणादायी म्युरल्स उभारण्याकामी आणि सर्व स्थापत्य विषयक कामांसाठी 4 कोटी 87 लाख 96 हजार रुपये खर्चासही मान्यता देण्यात आली. या ठिकाणी जुना पुतळा व परिसरातील चौथरा व बांधकाम काढून घेणे, नवीन चौथरा उभारणे, पुतळ्याशेजारील दोन्ही बाजूस जिना व लिप्टचा गाळा उभारणे, सुशोभीकरणाकरीता पुतळ्यावर घुमट उभारणे, पुतळ्यासमोर 350 लोकांकरिता ओपन एअर थिएटर, स्टेजच्या मागे कलाकारांसाठी विश्रांती कक्ष, बगीचा, ब्राँझ मधील उठाव शिल्प, भिंतीकरीता बांधकाम, पूर्ण परिसरासाठी सीमाभिंत आणि स्वच्छतागृह या स्थापत्यविषयक कामांचा समावेश करण्यात आला आहे.

Chinchwad : सहायक पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या

महात्मा फुले पुतळ्याशेजारी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती (Pimpri) पुतळा बसविण्यात येणार आहे. परिसरात फुलेसृष्टी अंतर्गत त्यांच्या जीवनावर आधारित प्रेरणादायी ब्राँझ धातूतील 12 बाय 8 फूट असे म्युरल्स बसविण्यात येणार आहे. पुतळ्याच्या दोन्हीही बाजूस विहीर कारंजे आदीसह विविध कामे समाविष्ठ आहेत. या कामांमध्ये आणखीन भर पडणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या वतीने आणखी निधी मंजूर केला आहे. विद्युत विभागाच्या क्तीने त्यासाठी निविदा प्रसिद्ध केली आहे. 2 कोटी 35 लाख 29 हजार रुपयांची कामे केली जाणार आहेत. आठ महिने कालावधीत ही कामे करण्यात येणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.