Maval : श्रीमंत सरदार विठोजी कारके व सरदार नावजी बलकवडे यांचा लोहगड विजय स्मृतिदिन संपन्न

एमपीसी न्यूज – श्रीमंत सरदार विठोजी कारके व (Maval) सरदार नावजी बलकवडे यांचा लोहगड विजय स्मृतिदिन नुकताच लोहगड येथे संपन्न झाला. यानिमित्त किल्ले लोहगड येथे शिव मंदिरामध्ये तसेच कार्ले येथे एकविरा आई मंदिरात पूजा करण्यात आली.

आपल्या पराक्रमी पूर्वजांकडून व गौरवशाली इतिहासातून प्रेरणा घेऊन तरुणांनी देशोन्नतीसाठी योगदान द्यावे, असा संदेश शिवव्याख्याते सचिन ढोबळे यांनी आपल्या व्याख्यानातून दिला.

Pune : शिक्षक भरती घोटाळ्या प्रकरणी शैलजा दराडेचा जामीन अर्ज फेटाळला

इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे, सहायक पोलीस निरीक्षक उमेश कारके यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमास शिवसेना नेते भारत ठाकुर, तळेगावचे माजी नगराध्यक्ष कृष्णराव कारके, पंचायत समीती सदस्य साहेबराव कारके, माजी सरपंच बाळासाहेब कारके, नारायन कारके, अशोक कारके, ऋषिकेश कारके, सचिन टेकवडे, शिरीष महाराज मोरे, कुंदन कारके, संजय कारके, योगेश कारके व उर्से, डोणे, आढे, देहू, लोहगड येथील ग्रामस्थ (Maval) उपास्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.