Chinchwad : वाल्हेकरवाडीतील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

एमपीसी न्यूज – वाल्हेकरवाडीतील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये (Chinchwad) विठ्ठल रुक्मिणी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यानिमित्त मंदिरात 28 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

वाल्हेकरवाडी येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात हभप गणेश महाराज कार्ले यांच्या हस्ते रविवारी (दि. 27) नवीन मूर्ती स्थापन करण्यात आली. यावेळी मूर्तीची भव्य दिंडी काढून ग्रामस्थांनी स्वागत केले. रविवारी सायंकाळी हभप पांडुरंग महाराज घुले यांचे कीर्तन झाले.

Maval : श्रीमंत सरदार विठोजी कारके व सरदार नावजी बलकवडे यांचा लोहगड विजय स्मृतिदिन संपन्न

त्यानंतर 28 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान मंदिरात श्री विठ्ठल तरुण मंडळाच्या वतीने (Chinchwad) विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. पहाटे पाच ते सात काकड आरती, सकाळी 9 ते 11 विठ्ठल महात्म्य ग्रंथ वाचन, दुपारी 12 ते 2 भजन, सायंकाळी साडे सहा ते साडे आठ या कालावधीत कीर्तन सेवा सादर केली जात आहे.

बुधवारी (दि. 30) श्रीकांत महाराज पातकर, गुरुवारी (दि. 31) मयूर महाराज बोडके, शुक्रवारी (दि. 1) आसाराम महाराज बढे, तर शनिवारी (दि. 2) गणेश महाराज कार्ले यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.