Maval : मावळ तालुक्यातील 47 गावातील पोलीस पाटील पदांसाठी आज आरक्षण सोडत

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील 47 गावातील पोलीस पाटील (Maval) पदांसाठी आज (बुधवार, दि. 30) आरक्षण सोडत जाहीर होणार आहे. बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता बावधन येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात महसूल प्रशिक्षण प्रबोधिनी याठिकाणी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मावळ तालुक्यातील 47 आणि मुळशी तालुक्यातील 49 अशा एकूण 96 रिक्त असलेल्या पोलीस पाटील पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

त्यानुसार संबंधित पदांची आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. यानंतर संबंधित पदांच्या भरती प्रक्रियेला वेग येणार आहे. यामध्ये वडगाव आणि तळेगाव या शहरांच्या पोलीस पाटील पदांचा देखील समावेश आहे.

मावळ तालुक्यातील पोलीस पाटील पदे रिक्त असलेली गावे – Maval

नवलाख उंबरे, जांबवडे, मंगरूळ, शिरे, कातवी, बोरिवली, वडेश्वर, घोणशेत, राखसवाडी, कुसगाव खुर्द, कुणे नाणे मावळ, सदापुर, खामशेत, वेल्हवळी, शिलाटणे, बोरज, दुधिवरे, मालेवाडी, आपटी, गेंवडे आपटी, आतवण, आंबेगाव, महागाव, येळसे, कडधे, बेडसे, करुंज, ब्राह्मणवाडी (बऊर), भडवली, पानसोली, कोळेचाफेसर, तुंग, माजगाव, आंबी, सोमाटणे, दारुंब्रे, चांडखेड, डोणे, पाचाणे, कुसगाव पवन मावळ, वडगाव मावळ, खडकाळा, कुसगाव बुद्रुक, वलवण, तुंगार्ली, भुशी, तळेगाव दाभाडे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.