PCMC : महापालिकेच्या नियमबाह्य 357 होर्डिंग चालकांना नोटीसा

एमपीसी न्यूज – महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने (PCMC ) शहरातील नियमबाह्य असलेल्या 357 होर्डिंगचालकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. नोटिशीला समाधानकारक उत्तर न दिल्यास ते होर्डिंग तोडून जप्तीची कारवाई करण्याचा इशारा आकाशचिन्ह व परवाना विभागाचे उपायुक्त सुभाष इंगळे यांनी दिला आहे.

परवानगीपेक्षा अधिक आकाराचे होर्डिंग असणे, एका बाजूची परवानगी घेऊन दोन्ही बाजूने होर्डिंग लावणे, होर्डिंगवर आकाशचिन्ह व परवाना विभागाने दिलेला परवाना क्रमांकाचा छोटा फलक न लावणे या कारणांसाठी या नोटिसा देण्यात आल्या आहेत. या अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्यात येणार आहे.

शहरात 20 एप्रिल ते आतापर्यंत तब्बल 168 अनधिकृत होर्डिंग तोडण्यात आले आहेत. त्यातील 95 होर्डिंग मालक व चालकांनी काढून घेतले आहेत. तर, एकूण 73 होर्डिंग महापालिकेने तोडून जप्त केले आहे. त्यातून मिळालेल्या भंगारातून पालिकेस 2 कोटी 30 लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.

Maval : मावळ तालुक्यातील 47 गावातील पोलीस पाटील पदांसाठी आज आरक्षण सोडत

न्यायालयात गेलेल्या अनधिकृत 281 होर्डिंपैकी 263 होर्डिंगचे एकूण 4 कोटी 19 लाख 50 हजार 816 रुपये परवाना शुल्क महापालिकेकडे जमा करण्यात आले आहेत.

न्यायालयात गेलेल्या होर्डिंगचालकांकडून पाचपट शुल्क (PCMC) घेऊन त्याच्या होर्डिंगला रितसर परवाना दिला जाणार आहे. पाचपट शुल्क न भरणारे होर्डिंग तोडून जप्त करण्यात येणार आहेत, असे उपायुक्त इंगळे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.