NCP : मी चुकलो तर मला पण नोटीस पाठवा; अजित पवार यांची नेत्यांना कानउघडणी

एमपीसी न्यूज : राज्यातील महिलांच्या (NCP) प्रश्नावर कायम सतर्क आणि राजकीय नेत्यांनी महिलांबाबत अपशब्द वापरल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर त्यांच्या खास शैलीत सुनावतात. तसेच नोटीस काढून खुलासा सादर करण्याचे आदेश देखील काढतात.

रुपाली चाकणकर यांच्या याच कामाच कौतुक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओमध्ये अजित पवार म्हणाले की, महिला आयोगाची जबाबदारी रुपाली चाकणकर यांच्याकडे आहे.

एखाद्या व्यक्तीने कोणत्याही प्रकारचे विधान केले, तर ती गप्प बसत नाही. तर लगेच नोटीस पाठवते. काल परवा तर आमच्याच मंत्रिमंडळातील एक वरीष्ठ सदस्याला नोटीस काढली.

PCMC : महापालिकेच्या नियमबाह्य 357 होर्डिंग चालकांना नोटीसा

जर उद्या प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच जरी (NCP) चुकले  तरी नोटीस गेली पाहिजे आणि अजित पवारच जरी चुकले तरी नोटीस गेली पाहिजे. असे अजित पवार म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

तसेच ते पुढे म्हणाले की, न्याय सर्वांना सारखा मिळाला पाहिजे. आम्ही देखील बोलताना नोटीस येईल अशा पद्धतीने वागता कामा नये. असा सल्ला देखील उपस्थित नेतेमंडळींना त्यांनी दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.