PCMC : महापालिकेचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांची बदली

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक (PCMC) विभागाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांची ठाण्याला बदली झाली आहे.

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) महसूल विभागाचे उपजिल्हाधिकारी असलेले बाळासाहेब खांडेकर यांची 14 सप्टेंबर 2019 रोजी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तपदी नियुक्ती झाली होती. तो विभाग कायम ठेवून खांडेकर यांची ठाणे येथे उपमहानियंत्रक नोंदणी व उपनियंत्रक मुद्रांक म्हणून नियुक्ती झाली आहे.

बाळासाहेब खांडेकर यांनी कोरोना काळात अतिशय चांगले काम केले. नेहरुनगर येथील जम्बो कोविड केअर सेंटरची त्यांनी जबाबदारी सांभाळली. दोनवेळा कोरोनाची बाधा होवूनही त्यांना कोविड सेंटरमध्ये काम केले.

NCP : मी चुकलो तर मला पण नोटीस पाठवा; अजित पवार यांची नेत्यांना कानउघडणी

महापालिकेत सामान्य प्रशासन विभाग, आकाश चिन्ह व परवाना, क्रीडा, निवडणूक (PCMC) , जनगणना, क्षेत्रीय अधिकारी अशा विविध विभागांची जबाबदारी सांभाळली. सांगली येथे पूरग्रस्त भागात मदतीसाठी गेलेल्या पथकात त्यांचा समावेश होता. महापालिकेतील चार वर्षाच्या कामाबाबत आपण समाधानी असल्याचे खांडेकर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.