Sinhagd Road : वादात्मक भाषण केल्याप्रकरणी कालीचरण महाराज यांच्यावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : छत्रपती शिवाजी महाराज जयंती (Sinhagd Road) निमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात वादात्मक भाषण केल्याप्रकरणी कालीचरण महाराज उर्फ अभिजीत धनंजय सराग यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिंहगड रोड पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 11 मार्च रोजी सिंहगड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सनसिटी रोड जवळ हा कार्यक्रम पार पडला होता.

नितीन निवृत्ती खुटवड (वय 43 वर्ष, पोलिस हवलदार) यांनी फिर्याद दाखल केली आहे.

Pune : हिंदवी स्वराज्य महासंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त 11 मार्च रोजी हिंदू जनजागरण सभा कार्यक्रमाचे (Sinhagd Road) आयोजन करण्यात आळे होते. यावेळी त्यांनी ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्माविरोधात वादात्मक भाषण केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सर्व बाबींची पडताळी करत असल्याने गुन्हा नोंद करण्यास उशीर झाल्याचे सिंहगड रोड पोलिसांनी नमूद केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.