Punawale : कचरा डेपोची जागा ताब्यात घेण्यास 15 वर्षांपासून अपयश; आता चंद्रपूरला जागा देण्याच्या हालचाली

एमपीसी न्यूज – वाढती लोकसंख्या, नागरिकरणामुळे (Punawale) कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस वाढत असताना कचरा डेपोसाठीच्या पुनावळेतील जागेचे 15 वर्षांपासून भिजत घोंगडे कायम आहे. पुनावळे परिसरात मोठे गृहप्रकल्प झाल्याने कचरा डेपोला विरोध आहे. दरम्यान, पुनावळेतील 22.8 हेक्टर जागा ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू असून त्या मोबदल्यात वन विभागालाचंद्रपूरला जागा देण्याच्या हालचाली सुरू आहेत.

औद्योगिकनगरी पिंपरी-चिंचवडची स्मार्ट सिटी, मेट्रो सिटीकडे वाटचाल सुरू आहे. शहरात वास्तव्यास नागरिकांची मोठी पसंती मिळत आहे. चोहोबाजूने शहर झपाट्याने विस्तारत आहे.

लोकसंख्या 30 लाखांच्या घरात गेली. त्यामुळे कचऱ्याची समस्याही निर्माण होऊ लागली आहे. सन 2017 मध्ये शहरात प्रतिदिन 832 टन कचरा निर्माण होता. सात वर्षांत यामध्ये चारशे टनाने वाढ झाली. साडेबाराशे टन दैनंदिन कचरा निर्माण होत आहे. घरोघरचा कचरा संकलित करुन मोशीतील कचरा डेपोत 1991 पासून टाकला केला जातो.

Sinhagd Road : वादात्मक भाषण केल्याप्रकरणी कालीचरण महाराज यांच्यावर गुन्हा दाखल

हा परिसर 81 एकरचा आहे. या डेपोची क्षमता संपुष्टात येऊ लागली आहे. त्यामुळे पालिकेने 2008 मध्ये पुनावळेतील वन विभागाची 26 हेक्‍टर जागा घेण्याचा निर्णय घेतला. त्याबदल्यात मुळशीतील पिंपरी येथे वन विभागाला महापालिका पर्यायी जागा देणार होती. मात्र, या ठिकाणी मुरूम असल्याने वन विभागाने या जागेचा पर्याय नाकारला. पुनावळेतील जागेवर वृक्ष आहेत.

कचरा डेपो झाल्यास झाडे तोडावी लागतील. त्यामुळे वन विभागाला जाडे लावण्यासाठी जागा देणे बंधनकारक आहे. (Punawale) महापालिकेने आत्तापर्यंत वनीकरणासाठी तीन कोटी 57 लाख 13 हजार रूपये वेळोवेळी अदा केले आहेत.

पुनावळेत गृहप्रकल्प झाल्याने बांधकाम व्यावसायिक, राजकारणी, स्थानिकांचा कचरा डेपोला विरोध आहे. त्यामुळे कचरा डेपोची जागा ताब्यात घेण्यात पालिकेला यश आले नाही. लोकप्रतिनिधींनी सामजस्यांची भूमिका घेतली नाही. तर, भविष्यात शहरातील कच-याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.