Punawale : बड्या व्यापा-यांच्या अतिक्रमणावर कारवाईस टाळाटाळ

सामाजिक कार्यकर्त्या निलिमा तोटकर यांचा आरोप

एमपीसी न्यूज – महापालिकेकडून छोट्या व्यापा-यांच्या अतिक्रमणावर ( Punawale) कारवाई केली जाते. परंतु, पुनावळे भागातील बड्या व्यापा-यांच्या अतिक्रमणावर कारवाईस टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या निलिमा तोटकर यांनी केला. अतिक्रमणावर कारवाई करावी अन्यथा सामाजिक संघटना तीव्र आंदोलन करतील असा इशाराही त्यांनी दिला आहे.

याबाबत महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. त्यात तोटकर यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड हद्दीमध्ये पुनावळे येथील अनधिकृत बांधकामे वाढलेले दिसून येत आहे. महापालिकेच्या हद्‌दीमध्ये छोट्या-मोठ्या व्यापायांवर तसेच भाजीपाला विकेत्यांवर कारवाई करताना दिसतात.

 

 

पण, मोठ्या व्यापारी वर्गावर अद्याप कारवाई करताना महापालिका कर्मचारी किंवा अतिक्रमण विभाग कारवाई करताना दिसून आलेला नाही. पुनावळे येथे सर्वे नं. 6/8 येथे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले असून अद्विक इंडस्ट्रीज, मोरया ड्रायक्लिरन्स, माऊली कार केअर, श्री लक्ष्मी एंटरप्रायजेस, श्री लक्ष्मी फेब्रिकेटर्स, मिलन मार्बल इत्यादी असे अनेक मोठ मोठे अतिक्रमण  झाले आहेत.

Pimpri Chinchwad Police Recruitment : पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलात 262 पदांची भरती; आजपासून अर्ज करण्यास सुरुवात

महापालिकेचा निधी मोठ्या प्रमाणामध्ये बुडवला जात आहे. त्वरित 2 दिवसांच्या आत हे अतिक्रमण हटवण्यात यावे. शहराला पूर्णपणे मोकळा श्वास देण्यात यावा. तसेच या जागेमध्ये अनेक प्रकारची झाडे होती. तेथील अतिक्रमण केलेल्या व्यक्तींनी 50 वर्षापूर्वीची मोठ-मोठे झाडे बेकायदेशीररित्या तोडल्याचा संशय आहे. या प्रकारची शहानिशा करुन त्वरीत लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी. शहरामध्ये अतिक्रमणाचा विळखा मोठ्या प्रमाणात होईल. अन्यथा अनेक सामाजिक संघटनांच्या वतीने ‘तीव्र आंदोलन’ करण्याचा इशारा दिला आहे.

याबाबत महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त मनोज लोणकर  ( Punawale)  म्हणाले की, तक्रार आली आहे. खात्री करुन कारवाई केली जाईल.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.