Pune : विधानसभेच्या निवडणुकीत अनेक आमदार पुन्हा पक्षात येतील – रोहित पवार

एमपीसी न्यूज  – बारामतीच्या सभेत जो प्रतिसाद शरद पवारांना ( Pune) मिळाला त्यावरून विधानसभेच्या निवडणुकीत अनेक आमदार पुन्हा येतील असे चित्र दिसते , असे वक्तव्य आज रोहित पवारांनी केले. पुण्यात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.

शरद पवार राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष भाजपसोबत जाणार नाही असे लेखी पत्र प्रकाश आंबेडकरना देणार का असे विचारले असता रोहित पवार म्हणाले,   शरद पवार राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष भाजपसोबत जाणार नाही  असे लेखी पत्र  प्रकाश आंबेडकर  मागत  असतील तर ते त्यांना दिले जाईल. आंबेडकर हे महाविकास आघाडी बरोबर आहे ही चांगली गोष्ट आहे.वंचित ज्या सीट मागतील  त्या सीट त्यांना द्यायला काही हरकत नाही आणि लिहून द्यायला काही हरकत नाही .सत्ताही प्रश्न सोडवण्यासाठी आहे , लोकांच्या हिताचा निर्णय घेण्यासाठी आहे.

Punawale : बड्या व्यापा-यांच्या अतिक्रमणावर कारवाईस टाळाटाळ

तसेच  भाजप फक्त त्यांच्या चिन्हाचा आणि पक्षाचा विचार करते. एखाद्या मित्र पक्षाची मदत लागली नाही तर भाजप त्यांना बाजूला करून टाकतो.

कात्रजच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयातून बिबट्या पसार झाला आहे ,त्याबद्दल रोहित पवारांची प्रतिक्रीया विचारली असता ते म्हणाले, कुठल्याही पक्षात नेतेच विचार सोडून पळून जात असतील तर बिबट्याचं काय घेऊन बसलात.     दक्षता घेणे गरजेचे आहे,   कोणतीही जीवित हानी होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे.

जरांगे पाटलांना तुमच्याच पक्षाने उभा केले आहे असे विरोधी पक्ष म्हणत आहे, यावर ते म्हणाले, विरोधी पक्ष आमच्यावरती टीका करतोय तो त्यांचं काम ( Pune) आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.