Pune : आता घरबसल्या विद्यार्थ्यांना मिळणार सावित्रीबाई फुले विद्यापिठातील शैक्षणिक कागदपत्रे

एमपीसी न्यूज – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Pune) विविध शैक्षणिक विभागांमध्ये, संलग्न महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना त्यांची शैक्षणिक कागदपत्रे आता ऑनलाइन अर्ज भरून घरबसल्या मिळणार आहेत.

विद्यापीठाच्या विद्यार्थी सुविधा केंद्राकडून (स्टुडंट फॅसिलिटेशन सेंटर) विद्यार्थ्यांना शैक्षणिक कागदपत्रे दिली जातात. त्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करून, त्याची मुद्रित प्रत आवश्यक कागदपत्रांसह विद्यापीठात सादर करावी लागते. संपूर्ण प्रक्रिया केवळ ऑनलाइन पद्धतीने राबवण्याची मागणी विद्यार्थी संघटनांकडून करण्यात येत होती.तसेच अधिसभा सदस्यांनीही त्याबाबतची मागणी केली होती. त्यानंतर विद्यापीठाने नेमलेल्या परीक्षासुधार समितीच्या माध्यमातून आता ही प्रक्रिया पूर्ण ऑनलाइन आणि कागदविरहित करण्यात येत आहे.

Pune : विधानसभेच्या निवडणुकीत अनेक आमदार पुन्हा पक्षात येतील – रोहित पवार

पहिल्या टप्प्यात विद्यार्थ्यांना ट्रान्स्क्रिप्टसाठी ऑनलाइन सुविधा देण्यात येणार आहे, तर पुढील टप्प्यात पदवी प्रमाणपत्र, परदेशातील विद्यापीठांत प्रवेशासाठी आवश्यक गुणपत्रिका, स्थलांतर प्रमाणपत्र, उत्तीर्णता प्रमाणपत्र अशी कागदपत्रे दिली जाणार आहेत.

विद्यापीठाच्या संगणकीय प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर परीक्षा विभागाकडून त्या संदर्भातील कार्यवाही पूर्ण केली जाईल. त्यानंतर ती कागदपत्रे विद्यार्थ्यांच्या ‘स्टुडंट प्रोफाइल’मध्ये उपलब्ध होतील. त्यानंतर ती कागदपत्रे विद्यार्थ्यांना डाउनलोड करून (Pune)  घेता येतील.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.