Chinchwad : मॅटच्या आदेशानंतर ‘त्या’ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या रद्द

एमपीसी न्यूज – आगामी लोकसभा निवडणुकांच्या ( Chinchwad) पार्श्वभूमीवर राज्यातील 130 पोलीस निरीक्षकांच्या इतर घटकांमध्ये बदल्या करण्यात आल्या होत्या. त्याबाबत अनेक अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट) मध्ये धाव घेतली होती. मॅटच्या आदेशानंतर बदली झालेल्या 65 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड मधील 13 आणि पुणे शहर मधील 2 पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे.

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस महासंचालक कार्यालयाकडून सर्व घटक प्रमुखांकडून बदलीपात्र पोलीस निरीक्षकांची माहिती मागवण्यात आली होती. त्या माहितीच्या आधारे महासंचालक कार्यालयाकडून राज्यातील 130 पोलीस निरीक्षकांची त्यांच्या घटकातून इतर घटकात बदली करण्यात आली होती. या बदली आदेशाच्या विरोधात काही पोलीस निरीक्षकांनी मॅटमध्ये धाव घेतली.

Pune : आता घरबसल्या विद्यार्थ्यांना मिळणार सावित्रीबाई फुले विद्यापिठातील शैक्षणिक कागदपत्रे

मॅटने राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना बदली आदेशाची पडताळणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार 21 फेब्रुवारी रोजी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी संबंधित घटक प्रमुखांची बैठक घेतली. त्यानंतर पुणे शहर (2), पिंपरी-चिंचवड (13), ठाणे शहर (7), विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र (1) अशा एकूण 23 पोलीस निरीक्षक जे 21 डिसेंबर 2023 रोजी संबंधित घटकात कार्यकारी पदावर कार्यरत होते, त्यांना आयोगाच्या निकषाप्रमाणे जिल्ह्याबाहेर बदली करण्यापासून सवलत असल्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.

मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर महासंचालक कार्यालयाकडून देखील 42 पोलीस निरीक्षकांची बदलीबाबत पडताळणी करण्यात आली. त्यानंतर एकूण 65 पोलीस निरीक्षकांची बदली रद्द करण्याचे आदेश दिले. अपर पोलीस महासंचालक (आस्थापना) संजीव कुमार सिंघल यांनी याबाबतचे आदेश दिले ( Chinchwad)  आहेत.

बदली रद्द झालेले पिंपरी-चिंचवड शहर दलातील पोलीस निरीक्षक – शंकर डामसे, शैलेश गायकवाड, शंकर बाबर, ज्ञानेश्वर साबळे, दिपाली धाडगे, प्रसाद गोकुळे, सुनील पिंजण, विश्वजित खुळे, बाळकृष्ण सावंत, दीपक साळुंखे, शहाजी पवार, अरविंद पवार, अनिल देवडे.

बदली रद्द झालेले पिंपरी-चिंचवड शहर दलातील पोलीस निरीक्षक – विनायक वेताळ, राजू चव्हाण.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.