Maharashtra : पौर्णिमेनुसार रक्षाबंधन बिनधास्त करा, व्हायरल मेसेजवर विश्वास ठेऊ नका; ज्योतिष शास्त्रज्ञ व पंचागकर्त्यांचे स्पष्टीकरण

एमपीसी न्यूज : सध्या व्हाट्सअप किंवा इतर सोशल मिडीयावर (Maharashtra) एक मॅसेज व्हायरल होत असून त्यात सांगितले आहे की भद्रकाल सुरु होत असून आज रात्री नऊ पर्यंत राखीचा समारंभ करता येणार नाही. मात्र बहिण भावांनी एवढे खोलात न जाता बिनधास्तपणे पौर्णिमा सुरु झाल्यानंतर म्हणजे आज (बुधवारी) सकाळी 10 वाजून 59 मिनीटांनी दिवसभरात केव्हाही राखी बांधली तरी चालेल. मनात कोणताही किंतू न ठेवता सण साजरा करा असा सल्ला पंचाग व ज्योतीष शास्त्रज्ञांनी दिली आहे.

याविषयी एमपीसी न्यूजशी बोलताना ज्योतीष व वास्तू सल्लागार जयंत कुलकर्णी म्हणाले की, नागरिकांनी एवढ्या खोलात जाण्याची गरज नाही. सकाळी पौर्णिमा सुरु झाली 11 पासून तुम्ही दिवसभरात केव्हाही सण साजरा करु शकता.

तर एबीपी माझा या वृत्त वाहिनीला पंचागकर्ते मोहन दाते यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी अकरा पासून पौर्णिमा सुरु होते. मात्र भद्रा काल सुरु झाल्याने बरेच जण संभ्रमात आहेत.

पौराणीक काळात एक कथा सांगितली जाते की, राजाला राज्यातील पुरोहीत एक विधी करत ज्यामध्ये राजाला तांदूळ, हळदी कुंकु,चंदन, केसर यांची पुरचुंडी बनवून ती धाग्याला बांधून राजाला व इतर सैनिकांना बांधली जात असे. यावेळी यज्ञ-याग केले जाई.

Punawale : कचरा डेपोची जागा ताब्यात घेण्यास 15 वर्षांपासून अपयश; आता चंद्रपूरला जागा देण्याच्या हालचाली

यावेळी जो विधी केला जातो तो भद्रा कालात करु नये अशी मान्यता दिली (Maharashtra) आहे. मात्र बहिण भाऊ जे आता रक्षाबंधन साजरे करत आहेत त्याला कोणतीही बाधा नाही. सामाजिक बांधलकी किंवा एकमेकाबद्दल असलेले प्रेम व्यक्त करण्यासाठी एवढी खोलात जाण्याची गरज नाही. पौर्णिमा सुरु झाली की तुम्ही दिवसभरात केंव्हाही राखी बांधू शकता, असे दाते यांनी स्पष्ट केले आहे.

त्यामुळे मनात कोणताही किंतु-परंतु न ठेवता. आपल्या भावाला राखी बांधून सण साजरा करा..

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.