Maval Corona Update :  तालुक्यात आज नवीन 8 रुग्ण; तीन महिन्यांतील निच्चांक 

एमपीसीन्यूज – मावळ तालुक्यात मंगळवारी (दि. 31) 8 रुग्ण आढळले. तीन महिन्यांतील हा निच्चांक आहे. यामुळे कोरोनाचा कहर तालुक्यात कमी होत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

त्याचबरोबर सक्रीय रूग्णसंख्या देखील सातत्याने कमी होत आहे. ही बाब दिलासादायक असली तरी कोरोनाचे संकट अद्याप टळले नसल्याने नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन वैद्यकीय विभागाकडून करण्यात आले आहे.

तालुक्यात दिवसभरात 21 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज एकही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही. आतापर्यंत 523 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 209 आहे. शहरी भागात 05 तर ग्रामीण भागात 03 रुग्ण आज सापडले.

आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 05 रुग्ण सापडले. लोणावळा नगरपरिषद व वडगाव नगरपंचायत हद्दीत आज एकही रुग्ण सापडला नाही. तालुक्यातील कोरोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 26,821 झाली आहे. तर दिवसभरात 21 रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.

मंगळवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात तळेगाव दाभाडे ग्रामीण 02, कुसगाव बुद्रुक 01 असे एकूण 03 रुग्ण सापडले. 26,089 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 523 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 8,483, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 4,436 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 1331 रुग्ण सापडले आहेत. शहरी भागात 14,250 रुग्ण तर ग्रामीण भागात 12,571 रुग्ण आढळून आले आहेत. एकही रुग्णाची परिस्थिती गंभीर नाही.

कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 97.27 टक्के आहे. तर  मृत्यू दर 1.95 टक्के आहे. सद्यस्थितीत तळेगाव दाभाडे  नगरपरिषदमध्ये 80 लोणावळा नगरपरिषदमध्ये 38, वडगाव नगरपंचायतमध्ये 05  व ग्रामीण भागात 86 असे एकूण 209 रुग्ण आहेत, अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.